महाविकासआघाडीला अंगावर घेण्यासाठी विरोधा पक्ष नेता म्हणून भाजपने उतरवला तगडा पैलवान

महाविकासआघाडीला अंगावर घेण्यासाठी विरोधा पक्ष नेता म्हणून भाजपने उतरवला तगडा पैलवान

केंद्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे केंद्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडूनही शिक्कामोर्तब झाला असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 27 नोव्हेंबर : राज्यात महाविकासआघाडीचं सरकार येणार असल्यामुळे आता भाजप विरोधी पक्षात बसणार आहे. याच पार्श्वभूमिवर आता महाविकासआघाडीला धारेवर धरण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेते म्हणून निवड करण्यात आली आहे. यावर केंद्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे केंद्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडूनही शिक्कामोर्तब झाला असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, पुढच्या काही दिवसांमध्ये भाजप यासंबंधी एखादं पत्रक जारी करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे यावर भाजपची कोणती बैठक होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. खरंतर राजकीय घडामोडींमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. निवडणुका आणि निकाल लागल्यानंतर रोज एक नवीन राजकीय नाट्य जनतेनं पाहिलं. त्यात एकीकडे सगळ्यात जास्त जागा मिळूनही भाजप एकटं पडलं आणि दुसरीकडे वेगवेगळे विचार असलेले तीन पक्ष म्हणजेच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आता 'महाविकासआघाडी' या नावाखाली एकत्र संसार थाटणार आहे. त्यामुळे भाजपने आता विरोधी पक्षात बसवण्याचं ठरवलं आहे.

भाजप आणि शिवसेनेची निवडणूकपूर्व युती तुटली आणि महाराष्ट्रात मोठं सत्तानाट्य सुरू झालं. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीने या ऐतिहासिक आघाडीने सत्तास्थापनेचा प्रयत्न सुरू केल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. 'आमच्याकडे स्पष्ट बहुमत नाही. त्यामुळे आम्ही सत्तास्थापनेचा दावा करणार नाही,' असं म्हणत भाजपने सत्तेपासून दूर होण्याची भूमिका घेतली. मात्र 23 नोव्हेंबरला सकाळी अगदी नाट्यमयरित्या देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या मदतीने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.

इतर बातम्या - 'भाजापासोबत मैत्री धर्म पाळला म्हणून विदर्भात शिवसेना वाढू शकली नाही'

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीला हजर असणारे राष्ट्रवादीचे आमदार राज्याबाहेर गेले. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सूत्र फिरवताच राष्ट्रवादीचे आमदार पुन्हा पक्षाच्या गोटात दाखल झाले. आमदारांनी सोडलेली साथ आणि सुप्रीम कोर्टाने बहुमत चाचणी घेण्याचा दिलेला आदेश, यामुळे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने देवेंद्र फडणवीस सरकार कोसलळं.

अजित पवार यांचा घेतलेला पाठिंबा ही चूक होती का, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'मी योग्य वेळेवर योग्य गोष्टींवर बोलेन. काळजी करू नका.' एकूणच देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या पाठिंब्यावर सविस्तर खुलासा करणं आता टाळलं.

अजित पवारांचं पुढचं पाऊल कोणतं?

जित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी करत भाजपला पाठिंबा दिला होता. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रयत्नांनंतर राज्यातील भाजप सरकारही कोसळलं आणि अजित पवार यांचीही घरवापसी झाली. मात्र अजित पवार आता पक्षात पुन्हा आधीसारखे सक्रिय होणार का आणि मंत्रिमंडळातही दिसणार का, याबाबत चर्चा जोर धरू लागली आहे.

अजित पवार यांना मंत्रिपदाचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे पक्षाकडून त्यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाचा आग्रह धरला जाण्याची शक्यता आहे. मात्र एवढ्या मोठ्या राजकीय नाट्यानंतर अजित पवार लगेच मंत्रिमंडळात सामील होणार का, याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह आहे. मात्र राष्ट्रवादीच्या काही नेत्यांच्या मते अजित पवार हे मंत्रिमंडळात सहभागी होतीलच. त्यामुळे अजित पवार यांची पुढची रणनीती नक्की काय राहते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 27, 2019 08:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading