'शिवसैनिकाला रामाचं आणि अयोध्येचं नाव घेण्यासाठी आता 10 जनपथावर नाक रगडावं लागेल'

'शिवसैनिकाला रामाचं आणि अयोध्येचं नाव घेण्यासाठी आता 10 जनपथावर नाक रगडावं लागेल'

संपूर्ण सत्तासंघर्षामध्ये सगळ्यात जास्त बहूमत असतानाही भाजपला विरोधी पक्षाची भूमिका घ्यावी लागली. त्यामुळे आता महाविकासआघाडीला तोंडावर पाडण्यासाठी भाजप नेते आक्रमक पाहायला मिळतात.

  • Share this:

नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर : विधानसभा निवडणुकांमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा तीन वेगवेगळ्या विचारांच्या पक्षांनी एकत्र येत महाविकासआघाडी अशा नावाने संसार थाटला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. हा ऐतिहासिक आणि भव्यदिव्य शपथविधीसोहळा महाराष्ट्राच्या जनतेने 'याचि देही याचि डोळा' पाहिला. या संपूर्ण सत्तासंघर्षामध्ये सगळ्यात जास्त बहूमत असतानाही भाजपला विरोधी पक्षाची भूमिका घ्यावी लागली. त्यामुळे आता महाविकासआघाडीला तोंडावर पाडण्यासाठी भाजप नेते आक्रमक पाहायला मिळतात.

महाविकासआघाडीच्या या घरोब्यावर भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी घणाघाती टीका केली आहे. आता शिवसैनिकांना प्रभू रामाचं आणि अयोध्याचं नाव घेण्यासाठी सोनिया गांधी यांच्या निवास्थानी म्हणजे 10 जनपथवर नाक रगडावं लागणार अशा शब्दात गिरीराज यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. यासंबंधी गिरीराज यांनी सोशल मीडियावर ट्वीटही केलं आहे. खरंतर गिरीराज यांचं हे ट्वीट शिवसेनेला किती झोंबतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

'शिवसेनेनं बाळासाहेब ठाकरे यांच्या आत्म्यास सोनिया गांधी यांच्या हाती गहान ठेवलं आहे. आता शिवसैनिकांना प्रभू रामाचं आणि अयोध्येचं नाव घेण्यासाठी 10 जनपथावर नाक रगडावं लागणार आहे. शिवसेनेला पाहून असा अंदाज लगावला जाऊ शकतो की, कशा प्रकारे मुघलांनी भारतात आपले पाय पसरले असतील' अशा शब्दात गिरीराज सिंह यांनी शिवसेनेविरोधात ट्वीट केलं आहे.

एकीकडे महाविकासआघाडीच्या संसाराला खऱ्या अर्थाने काल सुरुवात झाली असताना एका मुद्द्यावर मात्र अद्याप वाद सुरू झाले. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असली तर अद्याप उपमुख्यमंत्री कोण? यावर सध्या वाद सुरू आहे. उपमुख्यमंत्रिपदावरून राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र आहे.

काही दिवसांपूर्वी पक्षातून बंड केलेले आणि नंतर पुन्हा स्वगृही परतलेले राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सत्तावाटपाबाबत भाष्य केलं आहे. 'विश्वासदर्शक ठराव आणि अध्यक्षपदाची निवडणूक आमच्या दृष्टीने महत्वाची आहे. इतर निर्णयांबद्दल पक्षातील वरिष्ठ निर्णय घेतील. सध्या फ्लोर टेस्टबद्दल चर्चा सुरू आहे,' अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 29, 2019 03:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading