VIDEO पॉर्न साइट्समुळे तरुण बिघडतात, केंद्राने बंदी घालावी; नितीश कुमारांचा अजब दावा

VIDEO पॉर्न साइट्समुळे तरुण बिघडतात, केंद्राने बंदी घालावी; नितीश कुमारांचा अजब दावा

अशा साइट्सवर महिलांविरुद्धच्या हिंसाचाराचे अनेक व्हिडीओ टाकले जातात. त्यामुळे तरुण बिघडतात आणि त्यांची दिशा भरकटते. त्यामुळे गुन्ह्यांचं प्रमाण वाढत आहे.

  • Share this:

पाटना 06 डिसेंबर : हैदराबाद आणि उन्नाव बलात्कार प्रकरणामुळे देशभर संताप निर्माण झालाय. देशभर मुलींवरच्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने संतापाची लाट उसळलीय. अशा घटनांमध्ये तातडीने तपास करून त्याची चौकशी करावी अशी मागणी होतेय. समाजात सर्वत्र संताप व्यक्त होत असतानाच अशा अनेक घटना समोर येत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येतेय. देशभर अशी परिस्थिती असताना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एक अजब दावा करत केंद्र सरकारकडे मागणीही केलीय. नितीश कुमार म्हणाले, पॉर्न साइट्सचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. अशा साइट्सवर महिलांविरुद्धच्या हिंसाचाराचे अनेक व्हिडीओ टाकले जातात. त्यामुळे तरुण बिघडतात आणि त्यांची दिशा भरकटते. त्यामुळे गुन्ह्यांचं प्रमाण वाढत आहे. अशा साइट्सवर बंदी घालावी अशी मागणी बिहार सरकार केंद्राकडे करणार असल्याचंही त्यांनी एका भाषणात सांगितलं.

एन्काउंटरला कोर्टात आव्हान

देशभर गाजत असलेल्या हैदराबाद ENCOUNTER प्रकरणाविरुद्ध तेलंगणा हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलीय. कोर्टाने ही याचिका दाखल करून घेतली आहे. त्यामुळे पोलिसांना आता सर्व प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत. प्रकरणाची पुढची सुनावणी ही 9 डिसेंबरला होणार असून तोपर्यंत आरोपींच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार होणार करू नका असे आदेश कोर्टाने पोलिसांना दिले आहेत. काही संघटनांनी ही याचिका दाखल केली आहे. या एन्काउंटरने देशभर खळबळ उडवून दिली होती. सामान्य माणसांनी त्याचं स्वागत केलंय तर अनेक नेते आणि संघटनांनी याचा तीव्र विरोध केलाय. त्यामुळे आता यापुढे हे प्रकरण न्यायालयात गेल्याने पोलिसांची कसोटी लागणार असून त्यांना सर्व प्रश्नांची उत्तर देत सगळे पुरावे सादर करावे लागणार आहेत.

हैदराबाद : पोलिसांनी सांगितली एन्काउंटरची सगळी कहाणी

हैदराबादमध्ये नेमकं काय घडलं?

तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काउंटरमध्ये ठार झाले. तपासासाठी नेत असताना सर्व आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर गोळ्या चालवल्या. ही घटना राष्ट्रीय महामार्ग 44 वर घ़डल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली आहे. त्यानंतर सर्व देशभर वादळ निर्माण झालं. सामान्य लोकांनी आणि काही नेत्यांनी त्याचं स्वागत केलंय तर अनेक मानवाधिकार कार्यकर्ते आणि संघटनांनी त्याला तीव्र विरोध केलाय. हैदराबादमधील महिला डॉक्टरवर करण्यात आलेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी कोर्टाने सर्व आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर पोलीस कोठडीत या बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपीने अनेक धक्कादायक खुलासे केले होते. 'आम्ही चौघे पीडित महिलेचा मृत्यू झाला आहे असं समजून तिला जाळण्याचा प्रयत्न करत होतो, तेव्हा ती जिवंत होती,' असं आरोपीनं म्हटलं होतं.

First published: December 6, 2019, 10:09 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading