SPECIAL REPORT : हैदराबाद ENCOUNTER मुळे नव्या वादाला सुरूवात!

SPECIAL REPORT : हैदराबाद ENCOUNTER मुळे नव्या वादाला सुरूवात!

ज्या ठिकाणी या चार आरोपींनी माणुसकीला काळिमा फासणारं अत्यंत घृणास्पद कृत्य केलं त्याच घटनास्थळावर गुन्ह्याचा सीन रिक्रियेट करण्यासाठी पोलीस आरोपींना घेऊन गेले होते.

  • Share this:

हैदराबाद, 06 डिसेंबर : हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातले चारही आरोपी पोलीस एन्काऊंटरमध्ये ठार झाले. अधिक तपासासाठी घटनास्थळी नेत असताना आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न करूनही आरोपी थांबले नाही. त्यावेळी पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला.

हैदराबाद बलात्कार प्रकरणातल्या चार आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. ज्या ठिकाणी या चार आरोपींनी माणुसकीला काळिमा फासणारं अत्यंत घृणास्पद कृत्य केलं त्याच घटनास्थळावर गुन्ह्याचा सीन रिक्रियेट करण्यासाठी पोलीस आरोपींना घेऊन गेले होते. मात्र, त्यावेळी आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांकडून त्यांना थांबवण्याचा प्रयत्नही करण्यात आला. परंतु आरोपी थांबले नाही. त्यामुळे पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला. शुक्रवारी पहाटे 3 वाजता ही घटना घडली. पोलिसांनी ही माहिती दिली.

बलात्कार प्रकणातल्या आरोपींचा एन्काऊंटर झाल्याची बातमी सकाळच्या सुमारास नागरिकांना  कळाली. त्यानंतर घटनास्थळावर नागरिकांनी प्रचंड गर्दी केली. पुलावर नागरिक आणि पुलाखाली पोलीस असं चित्र होतं. पुलावरून नागरिकांनी पोलिसांवर पुष्पवृष्टीही केली. आरोपींचं एन्काऊंटर झाल्यानं, आता माझ्या मुलीच्या आत्म्याला शांतता लाभेल, अशी प्रतिक्रिया तिच्या वडिलांनी व्यक्त केली.

हैदराबाद बलात्कार पीडितेचे जळालेल्या मृतदेहाचे फोटो पाहून संपूर्ण देश हादरला होता.  28 नोव्हेंबरला 4 जणांनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केला. त्यावेळी जवळपास 7 तास पीडितेला बांधून ठेवण्यात आलं. 27 नोव्हेंबर बुधवारी रात्री 9.30 वाजल्यापासून 28 नोव्हेंबर गुरुवारी पहाटे 4 वाजेपर्यंत पीडितेवर अत्याचार करण्यात आले. त्या चौघांनी पीडितेला टॉर्चर केल्याचंही पोस्टमॉर्टेममध्ये उघड झालं.

कामावरून परतत असताना पीडित तिच्या बिघडलेल्या स्कूटरजवळ आली.  बहिणीला कॉल करून माहिती दिल्यावर बहिणीनं तिला टॅक्सी करून परत ये, असं सांगितल. तेव्हा पीडितेनं काही माणसं मदत करायला तयार आहेत, असं सांगितलं. थोड्यावेळाने कॉल करते असं सांगून पीडितीने फोन ठेवला आणि त्यानंतर तिचा फोन बंद पडला. या घटनेनंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली.

28 तारखेला सकाळी सहा वाजता पीडितेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला. मात्र, आता चारही आरोपींचा एन्काऊंटर झाल्यानं न्याय झाल्याची प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात व्यक्त केली जात आहे. मात्र, एन्काऊंटरच्या पद्धतीवर अनेकांनी प्रश्नचिन्हही उपस्थित केलं जाते आहे. त्यामुळे आता नव्या वाद निर्माण झाला आहे.

 

Published by: sachin Salve
First published: December 6, 2019, 9:44 PM IST
Tags: Rape

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading