Mission Corona : बाळाचं नाव ठेवलं 'लॉकडाऊन', म्हणे मोदींचा संकल्प पुढे नेणार

Mission Corona : बाळाचं नाव ठेवलं 'लॉकडाऊन', म्हणे मोदींचा संकल्प पुढे नेणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूसारख्या जीवघेण्या आजारापासून संरक्षण करण्यासाठी घेतलेला हा निर्णय देशहिताचा.

  • Share this:

देवरिया, 31 मार्च : कोरोना व्हायरसचा (Covid - 19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाउन (Lockdown) जाहीर करण्यात आलं आहे. या लॉकडाऊन दरम्यान केंद्र सरकार जनतेच्या मदतीसाठी सातत्याने मोहीम राबवित आहे. लॉकडाऊनचा परिणाम सर्वसामान्यांच्या आयुष्यावरही होत आहे. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे एका कुटुंबाने आपल्या घरातील नवजात मुलाचं नाव ‘लॉकडाउन’ असं ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

मुलाच्या कुटुंबीयांचा असा विश्वास आहे की कोरोना (Coronavirus) विषाणूसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लॉकडाऊनचा घेतलेला निर्णय देशाच्या हिताचा आहे. म्हणूनच त्यांनी आपल्या मुलाचे नाव लॉकडाउन असे ठेवले आहे.

संबंधित - कोरोनाविरोधातील लढ्याच्या निर्णायक टप्प्यात, शिस्त मोडू नका; आपण जिंकणारच- CM

नवजात मुलाच्या पालकांनी हे नामकरण परस्पर संमतीने केले आहे. ते म्हणतात, की देशात लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे  त्यांनी आपल्या मुलाचे नाव लॉकडाऊन ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना विषाणूपासून बचावाचा संदेश देण्यासाठी त्यांनी हे नाव ठेवण्याचे ठरविलं. हे  उत्तर प्रदेशातील खुकुंदू शहरातील रहिवासी आहे. ते म्हणतात की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूसारख्या जीवघेण्या आजारापासून संरक्षण करण्यासाठी घेतलेला हा निर्णय देशाच्या हिताचा आहे.

वडील पवन म्हणाले, पंतप्रधान मोदींचे मिशन पुढे सुरू ठेवणार

या मुलाचा जन्म सोमवारी खुकुंदू शहरातील एका कुटुंबात झाला. कोरोनाचे संकट पाहता या कुटुंबाने या नवजात मुलाचे नाव लॉकडाउन असे ठेवले. मुलाचे वडील पवन म्हणतात की, आपण देशाच्या पंतप्रधानांचे कार्य पुढे चालवत आहोत. पवन म्हणाले की कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका लक्षात घेता देशाचे पंतप्रधान  महत्त्वपूर्ण निर्णय घेत आहेत. या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने घेतलेल्या सर्व गोष्टी आपण सर्वांनी पाळल्या पाहिजेत.

संबंधित -NRI झाला बेघर, मुंबईतील मजूर आणि भिकाऱ्यांच्या रिलीफ कॅम्पमधून घेतोय मदत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 31, 2020 09:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading