लॉकडाऊनमुळे बेघर तरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO

लॉकडाऊनमुळे बेघर तरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO

Viral Video: देशात सध्या अनेक ठिकाणी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या लोकांची पोटासाठी भ्रांत सुरू आहे. अशातच एका बेघर तरुणाचा मन सुन्न करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. ज्यामध्ये संबंधित तरुण रस्त्यावर सांडलेलं दूध पित आहे.

  • Share this:

कानपूर, 10 मे: भारतात सध्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत असल्यानं देशात अनेक ठिकाणी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या लोकांची पोटासाठी भ्रांत सुरू आहे. अनेकांना एकवेळच्या जेवणावर आपला उदरनिर्वाह करावा लागत आहे. अशा स्थितीत बेघर आणि भीक मागून जगणाऱ्या लोकांची परिस्थिती तर याहूनही बिकट आहे. लॉकडाऊनच्या काळात बेघर लोकांची काय अवस्था आहे, याचं चित्र स्पष्ट करणारा एक मन सुन्न करणारा व्हिडिओ (Emotional video) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.

संबंधित व्हिडिओ हा उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील सुतरखाने येथील आहे. याठिकाणी एक बेघर तरुण भुकेनं व्याकुळ झाल्यामुळे रस्त्यावर सांडलेलं दूध पिताना (drinking milk spilled on street) दिसत आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्व दुकानं किंवा घरं बंद असल्यामुळे अशा बेघर लोकांना कित्येक दिवस उपाशीपोटी जागावं लागत आहे. अशा अवस्थेत पोटाची भूक भागवण्यासाठी ते मिळेल ते अन्न खाण्याच्या प्रयत्न करत आहेत.

सुतरखाने येथील लोकांच्या मते, रविवारी सकाळ एका दुधवाल्याची सायकल रस्त्यावर कलंडली. त्यामुळे त्याचं सर्व दूध रस्त्यावर सांडलं. दूध रस्त्यावर सांडल्यानंतर दूधवाला तेथून निघून गेला. पण त्याचवेळी भुकेनं व्याकुळ झालेल्या तरुणा त्या ठिकाणाहून जात होता. यावेळी त्यानं रस्त्यावर सांडलेलं दूध पाहिलं आणि गुडग्यावर टेकून हे रस्त्यावर सांडलेलं दूध पिऊ लागला. ही घटना स्थानिक लोकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी संबंधित बेघर तरुणासाठी अन्नाची व्यवस्था केली.

हे ही वाचा-भय इथले संपत नाही! कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक बाकी, आणखी बिकट होणार परिस्थिती?

खरंतर, उत्तर प्रदेशातील लॉकडाऊनचा कालावधी आणखी काही दिवसांसाठी वाढवला जाऊ शकतो. त्यामुळे त्याठिकाणी हातावर पोट भरणाऱ्या लोकांना एकवेळच्या अन्नाचा प्रश्न सतावत आहे. दरम्यानच्या काळात हजारो कामगार बेरोजगार झाले आहे. त्यामुळे हाताला काम नाही, खिशात पैसा नाही आणि पोटात अन्न नाही अशी दुर्दैवी अवस्था लोकांची झाली आहे. तर दुसरीकडे लॉकडाऊन लागू केलेल्या जिल्हा प्रशासनाकडून अशा असहाय्य लोकांना रेशनही दिलं जात नाहीये. त्यामुळे अनेकांना उपाशी पोटी राहावं लागत आहे.

Published by: News18 Desk
First published: May 10, 2021, 10:09 AM IST

ताज्या बातम्या