कोरोनाला रोखण्यात यशस्वी झालेले केरळचे योद्धा महाराष्ट्राला अशी करणार मदत

कोरोनाला रोखण्यात यशस्वी झालेले केरळचे योद्धा महाराष्ट्राला अशी करणार मदत

केरळ राज्य सरकारला कोरोनाला रोखण्यात यश आलं आहे. त्यामुळे येथील आरोग्यमंत्र्यांचे जगभरात कौतुक होत आहे. आता महाराष्ट्रात कोरोनाला रोखण्यासाठी यांची मदत मिळणार आहे.

  • Share this:

मुंबई, 31 मे : कोरोनाव्हायरसचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या महाराष्ट्राच्या मदतीसाठी केरळ सरकार पुढे आले आहे. केरळ सरकारने महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या उपचारांसाठी 100 सदस्यांची वैद्यकीय टीम पाठविली आहे. केरळचे (Keral) अर्थमंत्री थॉमस इसाक यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी लिहिलं आहे की, 'कोविड - 19 विरूद्ध लढा देण्यासाठी केरळमधील डॉक्टर आणि परिचारिकांची 100 सदस्यांची वैद्यकीय पथक मुंबईला पाठविण्यात आलं आहे'.

ते म्हणाले की, 100 सदस्यीय संघाचे नेतृत्व संतोष कुमार करीत असून हे टीव्हीएम मेडिकल कॉलेजच्या अधीक्षकपदावर कार्यरत आहेत. त्यापूर्वी  अ‍ॅडव्हान्स टीम हिल्स रुग्णालयात पोहोचली आहे. ही टीम मुंबईतील 600 खाटांच्या रूग्णालयात सेवा देईल.

आणखी एक टीम पुढच्या आठवड्यात होईल दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, पुढील आठवड्यात 50 डॉक्टर आणि 100 परिचारिका यांची टीम महाराष्ट्रात येऊन कोरोना विषाणूची लागण झालेल्या रूग्णांवर उपचार करणार आहे.

महाराष्ट्र सरकारने मदतीची केली होती मागणी

मुंबईत कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे डॉक्टर आणि परिचारिकांच्या कमतरतेची समस्या समोर येत आहे. महाराष्ट्राचे वैद्यकीय संचालक डॉ. टी.पी. लहाने यांनी केरळच्या आरोग्य मंत्र्यांचा पत्र लिहून मदतीची मागणी केली होती. महाराष्ट्र सरकार त्यांचा मुक्काम आणि इतर सर्व व्यवस्था करेल व पगारही देईल, असेही सांगण्यात आले होते.

65 हजाराहून अधिक लोकांना संसर्ग

आरोग्य मंत्रालयाने आज जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात कोरोनाव्हायरसच्या एकूण रुग्णांची संख्या वाढून 1,82,143 झाली आहे आणि व्हायरसने आतापर्यंत 5,164 लोकांचा बळी घेतला आहे. रविवारी महाराष्ट्रात कोरोनाचे 2940 रुग्ण आढळल्यानंतर संक्रमित रूग्णांची संख्या 65168 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 86,984 रुग्णांनी कोरोनाला पराभूत केले आहे.

हे वाचा-रुग्णालयातील शवगृह भरले, आता मृतदेह ठेवण्यासाठी अशी केली जातेय व्यवस्था

First published: May 31, 2020, 9:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading