VIDEO : 'भारतीय पोलिसांचा आम्हाला अभिमान', आर्मीच्या अधिकाऱ्याने मिठाई देत केलं कौतुक

VIDEO : 'भारतीय पोलिसांचा आम्हाला अभिमान', आर्मीच्या अधिकाऱ्याने मिठाई देत केलं कौतुक

इंडियन आर्मीतील अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • Share this:

मुंबई, 22 मे : जग सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. या संकटात लढणाऱ्या कोरोना योद्ध्यांचे कौतुक सर्वच स्तरातून होत आहे. भारतीय लष्करातील सैनिकांनीसुद्धा या कोरोना योद्ध्यांच्या कर्तव्याचं कौतुक केलं आणि त्यांना मिठाईसुद्धा दिली. इंडियन आर्मीतील अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये दिसतं की, लष्करातील अधिकारी ड्युटीवर असलेल्या पोलिसांजवळ येतात. त्यावेळी लष्करी अधिकारी म्हणतात की, आम्ही जवान तुम्हाला मिठाई भेट देणार आहे. हे तुमच्यासाठी गिफ्ट असून आम्हाला तुमचा अभिमान आहे. लष्करातील अधिकारी पोलीस कर्मचाऱ्यांना म्हणतो की, भारतीय पोलिसांच्या चांगल्या कामाबद्दल आम्हाला अभिमान वाटत आहे. हा व्हिडिओ दोन दिवसांपूर्वी बिकानेर पोलिसांनी ट्विटरवर शेअर केला होता.

सैन्याचे अधिकारी कोरोनाच्या या संकट काळात पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या कामाचं कौतुक करतात. ते म्हणतात की, प्रत्येकजण कोरोनामुळे चिंतेत आहे. तुम्ही मात्र शांतपणे कर्तव्य बजावत आहेत. मग ते लोकांना रोखणं असो किंवा वाहतूक व्यवस्थेवर लक्ष ठेवण असो.

हे वाचा : मोठी बातमी! लॉकडाऊनमुळे देशातील 29 लाख लोक कोरोनापासून वाचले - सरकारचा दावा

First published: May 22, 2020, 5:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading