भारतात कम्युनिटी ट्रान्समिशन झालंय; ICMR च्या सदस्यांनीही केलं मान्य

भारतात कम्युनिटी ट्रान्समिशन झालंय; ICMR च्या सदस्यांनीही केलं मान्य

भारतातील ज्या तज्ज्ञांनी हा दावा केला आहे, त्यामध्ये ICMR च्या दोन सदस्यांचा समावेश आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 31 मे : भारतात (india) काही प्रमाणात सूट देत लॉकडाऊनच्या पुढच्या टप्प्यात प्रवेश केला जात आहे. तर दुसरीकडे भारतात कोरोनाव्हायरसचं कम्युनिटी ट्रान्समिशन (community transmission) झालेलं आहे, असं भारतातील तज्ज्ञांनी म्हटलं आहे. हा दावा करणाऱ्या ग्रुपमध्ये आयसीएमआर (ICMR) रिसर्च ग्रुपच्या दोन सदस्यांचाही समावेश आहे.

इंडियन पब्लिक हेल्थ असोसिएशन, इंडियन असोसिएशन ऑफ प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसीन आणि इंडियन असोसिएशन ऑफ एपिडेमिओलॉजिस्ट यांनी असं संयुक्त स्टेटमेंट दिलं आहे की, "देशात मोठ्या प्रमाणात कम्युनिटी ट्रान्समिशन झालं आहे. या टप्प्यात कोरोनाव्हायरसचा नाश होई शकतो, याची आशा करणं अवास्तव आहे"

हे वाचा - परिस्थिती झाली गंभीर! सर्वाधिक कोरोना प्रभावित पहिल्या 10 देशांमध्ये आता भारतही

सरकारनं भारतात आतापर्यंत कम्युनिटी ट्रान्समिशन झालेलं नाही असं वारंवार सरकारनं संगितलं आहे.  भारतात कोरोनाव्हायरस झपाट्याने वाढत असताना एक जूनपासून 3 महिन्यांपासून असेलला लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने अनलॉक केला जाणार आहे.

या तज्ज्ञांनी म्हटल्यानुसार, "25 मार्च, 2020 ते 30 मे, 2020 पर्यंत भारतात देशव्यापी लॉकडाऊन सर्वात कठोर होता तरीदेखील देशात कोरोना प्रकरणं वाढली.  प्रवाशांच्या येण्याजाण्याने समस्या अधिक गुंतागुंतीची झाली आहे"

हे वाचा - चिंताजनक! फक्त चौथ्या लॉकडाऊनमध्येच भारतात तब्बल 47% कोरोना रुग्णांची नोंद

या स्टेटमेंटवर हस्ताक्षर असलेल्यांमध्ये एम्सच्या कम्युनिटी मेडिसीन सेंटर्समधील प्राध्यापक डॉ. शशि कांत आणि बीएचयूच्या कम्युनिटी मेडिसीनचे माजी प्राध्यापक डॉ. डीसीएस रेड्डी यांचाही समावेश आहे. हे दोघंही कोरोनाव्हायरससाठी तयार करण्यात आलेल्या आयसीएमआरच्या रिसर्च ग्रुपमध्ये आहेत. डॉ. रेड्डी या ग्रुपचे अध्यक्ष आहेत.

हे वाचा - ...आणि लिफ्टच्या दरवाजाला लटकली चिमुरडी; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO व्हायरल

केंद्र, राज्य आणि जिल्हा स्तरावर इंटर डिसिप्लिनरी प्रिव्हेंटिव्ह हेल्थ (inter-disciplinary preventive health)आणि पब्लिक हेल्थ एक्स्पर्टची एक समिती गठीत करावी. तसंच जिल्हा, राज्य आणि केंद्र स्तरावर सामाजिक शास्त्रज्ञांची समिती स्थापना करण्याचा प्रस्ताव या समितीने दिला आहे.

First published: May 31, 2020, 8:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading