हैदराबाद ENCOUNTER विरुद्ध याचिका, 9 तारखेपर्यंत आरोपींवर अंत्यसंस्कार नाहीत

हैदराबाद ENCOUNTER विरुद्ध याचिका, 9 तारखेपर्यंत आरोपींवर अंत्यसंस्कार नाहीत

आता यापुढे हे प्रकरण न्यायालयात गेल्याने पोलिसांची कसोटी लागणार असून त्यांना सर्व प्रश्नांची उत्तर देत सगळे पुरावे सादर करावे लागणार आहेत.

  • Share this:

हैदराबाद 06 डिसेंबर : देशभर गाजत असलेल्या हैदराबाद ENCOUNTER प्रकरणाविरुद्ध तेलंगणा हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलीय. कोर्टाने ही याचिका दाखल करून घेतली आहे. त्यामुळे पोलिसांना आता सर्व प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत. प्रकरणाची पुढची सुनावणी ही 9 डिसेंबरला होणार असून तोपर्यंत आरोपींच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार होणार करू नका असे आदेश कोर्टाने पोलिसांना दिले आहेत. काही संघटनांनी ही याचिका दाखल केली आहे. या एन्काउंटरने देशभर खळबळ उडवून दिली होती. सामान्य माणसांनी त्याचं स्वागत केलंय तर अनेक नेते आणि संघटनांनी याचा तीव्र विरोध केलाय. त्यामुळे आता यापुढे हे प्रकरण न्यायालयात गेल्याने पोलिसांची कसोटी लागणार असून त्यांना सर्व प्रश्नांची उत्तर देत सगळे पुरावे सादर करावे लागणार आहेत.

हैदराबाद : पोलिसांनी सांगितली एन्काउंटरची सगळी कहाणी

हैदराबादमध्ये नेमकं काय घडलं?

तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काउंटरमध्ये ठार झाले. तपासासाठी नेत असताना सर्व आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर गोळ्या चालवल्या. ही घटना राष्ट्रीय महामार्ग 44 वर घ़डल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली आहे. त्यानंतर सर्व देशभर वादळ निर्माण झालं. सामान्य लोकांनी आणि काही नेत्यांनी त्याचं स्वागत केलंय तर अनेक मानवाधिकार कार्यकर्ते आणि संघटनांनी त्याला तीव्र विरोध केलाय. हैदराबादमधील महिला डॉक्टरवर करण्यात आलेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी कोर्टाने सर्व आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर पोलीस कोठडीत या बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपीने अनेक धक्कादायक खुलासे केले होते. 'आम्ही चौघे पीडित महिलेचा मृत्यू झाला आहे असं समजून तिला जाळण्याचा प्रयत्न करत होतो, तेव्हा ती जिवंत होती,' असं आरोपीनं म्हटलं होतं.

मुख्यमंत्र्यांना युजरने 4 दिवसांपूर्वी दिला होता सल्ला, अगदी तसाच झाला एन्काऊंटर

या आरोपींना पोलीस मध्यरात्री घटनास्थळी घेऊन गेले होते. त्यावरून आता प्रश्न उपस्थित केला जातोय. पोलिसांनी मुद्दाम आरोपींना मध्यरात्री घटनास्थळी नेलं आणि चकमक घडवून आणली असा आरोप होतोय. पण पोलिसांनी त्याचा खुलासा केलाय. घटनेनंतर जनसामान्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. त्यामुळे लोकांना माहिती होऊ नये म्हणून जास्तिची माहिती मिळविण्यासाठी आरोपींना मध्यरात्री घटनास्थळी नेलं असं पोलिसांनी सांगितलंय.

सामूहिक बलात्कारानंतर पीडित महिला पळून जाऊ नये म्हणून आरोपींनी तिचे हातपाय बांधले. तसंच त्या महिलेला जबरदस्ती दारूही प्यायला लावली. त्यानंतर ती महिला बेशुद्ध पडताच तिला पुलाखाली नेण्यात आलं आणि तिथं तिच्या अंगावर पेट्रोल टाकून त्या महिलेला जाळण्यात आलं,' असे खुलासे आरोपीने पोलीस कोठडीत केल्याचं हैदराबादमधील स्थानिक वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 6, 2019 09:48 PM IST

ताज्या बातम्या