नवी दिल्ली, 25 जानेवारी : 15 जून रोजी गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांविरोधात झालेल्या चकमकीत वीरमरण आलेल्या कर्नल संतोष बाबू यांना मरणोत्तर महावीर चक्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. लडाखच्या पूर्वीकडील (East Ladakh) गलवान खोऱ्यात (Galwan Valley) चिनी सैन्यासोबत झालेल्या हिंस्त्र झटापटीत शहीद झालेले कर्नल संतोष बाबू यांना यंदाच्या वर्षी महावीर चक्र देऊन (Maha Vir Chakra) सन्मानित करण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने प्रत्येक वर्षी देशाचं रक्षण करण्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या सैनिकांना वीरत्वासाठी पुरस्कार दिला जातो. यंदाच्या वर्षी प्रजासत्ताक दिनानिमित्ताने कर्नल संतोष बाबू यांना मरणोत्तर महावीर चक्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
परमवीर चक्रनंतर महावीर चक्र हे सैन्यातील सर्वात मोठा सन्मान आहे. सरकारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात चिनी सैन्याशी लढणाऱ्या अनेक जवानांना यंदा गॅलेंट्री अवॉर्डने गौरविण्यात येण्याची शक्यता आहे. पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले ASI मोहन लाल यांनादेखील गॅलेंट्री अवॉर्डने सन्मानित करण्यात येणार आहे. मोहन लाल यांनी IED लावलेली कार ओळखली आणि बॉम्बरवर गोळीबार केला होता.
हे ही वाचा-चीनच्या बंदरावर भयानक हाल सोसताहेत हे 39 भारतीय, गेले 6 महिने अडकून पडलेत
गलवान खोऱ्यात चिनी सैन्यासोबत झालेल्या संघर्षात शहीद झालेले कर्नल बी. संतोष बाबू चिनी पक्षासोबत केलेल्या चर्चेचं नेतृत्व करीत होते. मात्र रात्री उशिरा झालेल्या हिंसेत ते शहीद झाले. 16 बिहार रेजिमेंटचे कमांडिंग ऑफिसर असलेले कर्मल संतोष यांच्यासोबत त्यावेळी आणखी 19 जवानांना वीरमरण आलं. यासर्वांनी देशाच्या संरक्षणासाठी स्वत:च्या जीवाची पर्वा केली नाही. ते यामध्ये शहीद झाले मात्र, शत्रूला देशात घुसू दिलं नाही.