Elec-widget

हैदराबाद गँगरेप, हत्या: फास्ट ट्रॅट कोर्टात चालणार केस, 4 दिवसानंतर मुख्यमंत्र्यांची अॅक्शन

हैदराबाद गँगरेप, हत्या: फास्ट ट्रॅट कोर्टात चालणार केस, 4 दिवसानंतर मुख्यमंत्र्यांची अॅक्शन

हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात आता 4 दिवसानंतर राज्याचे मुख्यमंत्री केसीआर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

  • Share this:

हैदराबाद, 01 डिसेंबर : तेलंगनाची राजधानी हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात आता 4 दिवसानंतर राज्याचे मुख्यमंत्री केसीआर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणात लवकरात लवकर न्यायासाठी फास्ट ट्रॅक कोर्टात यावर सुनावणी करण्याचं त्यांनी जाहीर केले आहे. के.चंद्रशेखर राव यांनी याप्रकरणी प्रथमच प्रतिक्रिया व्यक्त करताना सर्व जबाबदार अधिकाऱ्यांना या प्रकरणाची जलद चौकशी व्हावी, असे निर्देश दिले आहेत.

मुख्यमंत्री केसीआर म्हणाले की, दोषींना लवकरात लवकर कठोर शिक्षा दिली जाईल. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याचे निर्देशही दिले. घटनेनंतर आपल्या पहिल्या जाहीर निवेदनात राव यांनी एका 25 वर्षीय महिलेवर चार जणांनी केलेल्या बलात्कार आणि हत्येला भयानक म्हटले आणि तिचा तीव्र क्लेश व्यक्त केला. त्यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांनी तातडीने कोर्टाची स्थापना करण्यासाठी आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी याची खबरदारी घेण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली. निवेदनात म्हटले आहे की, महिला पशुवैद्यकीय कुटूंबियांना सर्वतोपरी मदत करण्यास सरकार तयार आहे.

Loading...

अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी आयपीसी आणि सीआरपीसीमध्ये बदल करण्याचे आवाहन राज्याचे आयटी मंत्री के.टी. रामाराव यांनी केले. तेलंगनातील हैदराबादमधील डॉक्टर महिला सामूहिक बलात्कार आणि हत्ये प्रकरणी पोलिसांकडून धक्कादायक पुरावे आणि बाबी समोर आल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला. त्यामुळे एका टायर मेकॅनिकने दिलेल्या छोट्याशा माहितीनंतर 48 तासांमध्ये पोलिसांनी चौघांना अटक केली. पोलिसांनी आरोपींना कसं अटक केलं याची माहिती माध्यमांना दिली आहे.

1. महिला डॉक्टरच्या बहिणीने पोलिसांना सांगितले की तिच्या बहिणीच्या स्कूटीचा टायर पंक्चर झाला होता, त्यामुळे ती टोल प्लाझाजवळ अडकली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी प्रथम टोल प्लाझाजवळ टायर मेकॅनिकचा शोध सुरू केला. पोलिस मेकॅनिकजवळ पोहोचताच त्याने सांगितले की एक लाल रंगाचा स्कूटी त्याच्याकडे आली होती. इतकंच नाही तर ज्याने स्कूटी आणली तो रस्त्याच्या उलट्या बाजूने आला असल्याचेही सांगितले.

इतर बातम्या - 'हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी द्या नाहीतर आत्महत्या करेन'

2. पोलिसांना रस्त्याच्या दुतर्फा एक कारखाना आढळला, जेथे बाहेर सीसीटीव्ही बसविण्यात आले होते. तत्काळ या फुटेजची पाहणी करण्यात आली. हे दोन्ही आरोपी स्कूटीसह पुढे जात असल्याचे दिसून आले. दुसर्‍या फुटेजमध्ये बराच वेळ एक ट्रक उभा असल्याचे दिसून आले, परंतु अंधारामुळे ट्रकचा नंबर समजू शकला नाही.

3.  पोलिसांनी हाती लागलेले सीसीटीव्ही फुटेज 6 ते 7 तास मागे करून पाहिल्यानंतर लक्षात आले की दिवसभर हा ट्रक तेथे उभा होता. ट्रकचा नंबर मिळताच पोलिसांनी त्याच्या मालकाचा शोध सुरू केला. त्याचा मालक श्रीनिवास रेड्डी असून त्याच्याकडे 15 ट्रक आहेत.

4. ट्रक मालकाला सीसीटीव्ही फुटेज दाखवण्यात आले. स्कूटी घेऊन फिरत असलेल्या संशयितास तो ओळखू शकला नाही. पण मालकाने नक्कीच सांगितले की मोहम्मद आरिफ नावाचा चालक ट्रक चालवितो.

5. या दरम्यान, पोलिसांच्या दुसऱ्या पथकाने जवळील पेट्रोल पंपाचे सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यास सुरवात केली. इथे पुन्हा तोच संशयित व्यक्ती स्कूटीला मेकॅनिककडे घेऊन जात होता. हा माणूस इथल्या बाटलीत पेट्रोल किंवा डिझेल खरेदी करत असल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसलं.

6. पोलिस पथकाने मोबाइल टॉवरच्या स्थानावरून आरोपीचा शोध सुरू केला. पोलिसांनी ट्रक चालक आरिफलाही फोन केला, ज्याचा नंबर त्याच्या मालकाने दिला होता. या दोघांच्या माहितीच्या आधारे पोलिसांची टीम आरोपींकडे पोहोचली.

7. दरम्यान, टोल प्लाझापासून सुमारे 30 कि.मी. अंतरावर एका शेतकऱ्याने पोलिसांना कळवले की त्याला एक जळलेला मृतदेह दिसला. हरवलेल्या अहवालाच्या आधारे पोलिसांनी डॉक्टरांच्या कुटुंबियांना घटनास्थळी बोलावले. डार्क स्कार्फ आणि सोन्याच्या पेंडेंटसह डॉक्टर महिलेच्या मृतदेहाची ओळख पटली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 1, 2019 09:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...