अंगावर फाटकं रेनकोट आणि डोक्यावर हेल्मेट, जीव धोक्यात घालून कोरोनाग्रस्तावर असे उपचार करतायेत डॉक्टर

अंगावर फाटकं रेनकोट आणि डोक्यावर हेल्मेट, जीव धोक्यात घालून कोरोनाग्रस्तावर असे उपचार करतायेत डॉक्टर

कोरोनाग्रस्तांवर (Coronavirus) उपचार करणाऱ्या डॉक्टरांना (doctor) त्यांच्या सुरक्षेसाठी पुरेशा सोयीसुविधा नाहीत. 

  • Share this:

नवी दिल्ली, 31 मार्च : देशभरात (India) कोरोनाव्हायरसचे (coronavirus) 1,252 रुग्ण आहेत. या रुग्णांवर कित्येक डॉक्टर उपचार करत आहेत. आतापर्यंत 32 रुग्णांचा या व्हायरसने जीव घेतला आहे. त्यामुळे व्हायरसपासून इतर रुग्णांना वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून डॉक्टर झटत आहे. स्वत:च्या सुरक्षेसाठी पुरेशा सोयीसुविधा नसल्यानं डॉक्टर चक्क आता अंगावर रेनकोट (raincoat) आणि डोक्यावर हेल्मेट (helmet) घालून या रुग्णांवर उपचार करत आहेत.

कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्यांसाठी एक विशेष प्रकारचा ड्रेस आहे, ज्यामध्ये संपूर्ण शरीर झाकलं जातं. मात्र आता कोरोनाच्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनाच पुरेशी सुरक्षा मिळत नाहीये. त्यामुळे डॉक्टरांनी आता आपल्या सुरक्षेसाठी अंगावर रेनकोट चढवलं आहे, तेदेखील फाटलेलं. तर डोक्यावर बाईकचं हेल्मेट चढवलं आहे.

कोलकात्यातील Beliaghata Infectious Disease Hospital मध्ये कोरोनाव्हायरसच्या उपचारात महत्त्वाची भूमिका निभावत असणाऱ्य़ा डॉक्टरांना प्लास्टिक रेनकोट देण्यात आलेत. गेल्या आठवड्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची तपासणी करण्यासाठी हे रेनकोट दिल्याचं 2 डॉक्टरांनी सांगितलं. त्याचा फोटोही रॉयटर्सने दिला आहे. रुग्णालय प्रसासनाने याबाबत काहीही बोलण्यास टाळाटाळ केली.

हे वाचा - दर तासाला 9 नवे रुग्ण, भारतात Coronavirus चा धोका वाढला

हरयाणाच्या ESI रुग्णालयातील डॉ. संदीप गर्ग यांनी सांगितलं की, N95 मास्क नसल्याने ते कोरोनाव्हायरसपासून बचाव करण्यासाठी बाईकवरील हेल्मेट वापरत आहेत. 'मी सर्जिकल मास्क लावतो आणि त्यावर हेल्मेट घालतो. ज्यामुळे मला नीट पाहताही येतं आणि माझा पूर्ण चेहरा झाकला जातो', असं गर्ग म्हणाले.

मंगळवारी उत्तर प्रदेशातील  बहुतेक सरकारी रुग्णालयातील जवळपास 4,700 अॅम्ब्युलन्सचे ड्रायव्हर संपावर गेलेत. योग्य सेफ्टी गिअर आणि आरोग्य वीमा देण्याची त्यांनी केली आहे. रुग्णवाहिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष हनुमान पांडे यांनी रॉयटर्सशी बोलताना सांगितलं की, "आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आम्ही आमचा जीव धोक्यात घालणार नाही"

डॉक्टर जीव मुठीत धरून रुग्णसेवा देत आहेत. प्रत्येक जण घाबरला आहे, सुरक्षेशिवाय कुणालाही काम करायचं नाही, असं डॉक्टर म्हणाले. दरम्यान डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी लवकरच आवश्यक उपकरणं उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सरकारनं म्हटलं आहे.

हे वाचा - ‘आता जगायचं कसं? ‘कोरोना’मुळे आमच्या स्वप्नांची पार माती झाली’

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 31, 2020 06:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading