धार्मिक ऐक्याची प्रचिती! मुस्लीम महिलेनं शंकराच्या मंदिरात केला नवस पूर्ण

धार्मिक ऐक्याची प्रचिती! मुस्लीम महिलेनं शंकराच्या मंदिरात केला नवस पूर्ण

एका मुस्लीम महिलेनं (Muslim Women) पारंपरिक धार्मिक विधी शिव मंदिरात (Lord Shiva Temple) पूर्ण केल्याची एक अनोखी घटना घडली आहे.

  • Share this:

हैदराबाद, 27 जानेवारी : भारत देशात अनेक धर्माची (Religion) लोकं एकत्र गुण्यागोविंदानं राहतात. गणेशोत्सव असो वा ईद हे दोन्ही सण तितक्याच उत्साहात साजरी करणारी मंडळी आपल्या देशात आहेत. एकाच गावात एकमेकांच्या शेजारी अनेक वर्ष, कित्येक पिढ्या एकत्र राहिल्यानं त्यांच्यातील धर्मांच्या भिंती गळून पडतात. समाज विघातक मंडळींनी कितीही प्रयत्न केला तरी बहुतांश लोकांमधील मानवतेची वीण घट्ट आहे.

एका मुस्लीम महिलेनं (Muslim Women) तिचा नवस  शिव मंदिरात (Lord Shiva Temple) पूर्ण केल्याची एक अनोखी घटना तेलंगणा (Telangana) राज्यातील वेमुलावाडा (Vemulawada) मध्ये घडली आहे. या महिलेची अनोखी कृती सध्या तेलंगणा राज्यात चर्चेचा विषय बनला आहे.

काय आहे घटना?

धार्मिक एकतेचं उदाहरण घालून देणाऱ्या या महिलेचं नाव अप्सरा असं आहे. त्या मंथनी येथील रहिवाशी आहेत. त्यांनी वेमुलवाडामधील श्री राजा राजेश्वर स्वामी मंदिरात (Sri Raja Rajeshwara Swamy temple) कोडे मोक्कलू (Kode Mokkulu) ही जुनी परंपरा पूर्ण केली. या मंदिराच्या इतिहासात एखाद्या मुस्लीम महिलेनं अशा प्रकारचा नवस पूर्ण करण्याची ही पहिलीच घटना असल्याची माहिती मंदिर प्रशासनाच्या अधिकाऱ्यानं दिली आहे.

(हे वाचा-क्रिकेट सामन्यादरम्यान शाळेचं छत कोसळून अपघात; 10 विद्यार्थी जखमी)

कसा केला नवस पूर्ण?

अप्सरा यांनी बुरखा घालून मंदिरात प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी बैल देखील सोबत आणला होता. त्यांनी प्रथम मंदिराला प्रदक्षिणा घातली. त्यानंतर भाविक सामान्यपणे ज्या ठिकाणी बैलाला बांधतात तिथं बैल बांधला. अप्सरा यांनी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करुन श्री राजा राजेश्वर स्वामीचं दर्शन घेतलं.

कोडे मोक्कलू हा विधी एखादा नवस पूर्ण झाल्यानंतर केला जातो. यामध्ये देखील त्या महिलेची किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी केलेला एखादा नवस पूर्ण झाला म्हणून त्यांनी हा विधी केला असावा अशी माहिती मंदिरातील अधिकाऱ्यांनी दिली.

(हे वाचा-धक्कादायक! रिहॅबमध्ये सापडला Bigg Boss फेम अभिनेत्रीचा मृतदेह)

श्री राजा राजेश्वर स्वामी मंदिराच्या परिसरातच दर्गा आहे. त्यामुळे इथे अनेक हिंदू आणि मुस्लीम भाविकांची नेहमी वर्दळ असते. यापूर्वी येथील स्थानिक प्रशासनाचे सदस्य मोहम्मद रफी आणि त्यांच्य़ा कुटुंबीयांनी देखील कोडे मोक्कू विधी केला आहे.

Published by: News18 Desk
First published: January 27, 2021, 11:41 AM IST
Tags: telangana

ताज्या बातम्या