नवी दिल्ली, 5 मार्च : 15 ऑगस्ट 2022 हा दिवस भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. या दिवशी देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होणार आहे. त्यामुळे हा दिवस सर्वांसाठीच विशेष आहे. हा दिवस देशभरात अमृत महोत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे. या दिनाच्या स्मरणार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली विविध कार्यक्रमांच्या आयोजनासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या समितीची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये विविध क्षेत्रातील 259 सदस्यांचा सहभाग आहे. यामध्ये माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, भारताचे मुख्य न्यायाधीश शरद बोबडे, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा याशिवाय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांचाही समावेश आहे.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या कार्यक्रमांच्या पॉलिसीबाबत समितीतील सदस्य मार्गदर्शन करतील. समितीतील मान्यवर 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमांसाठी धोरणात्मक मार्गदर्शन व सूचना पुरवतील. हा कार्यक्रम 15 ऑगस्ट 2022 च्या 75 आठवड्यांपूर्वी म्हणजे 12 मार्च रोजी सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. या दिवशी महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात झालेल्या ऐतिहासिक मीठाच्या सत्याग्रहाला 91 वर्षे पूर्ण होत आहे. 12 मार्चपासून सुरू होणाऱ्या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी संबंधित उच्चस्तरीय समितीच्या सदस्यांसमवेत चर्चा करण्यासाठी समितीची पहिली बैठक 8 मार्च 2021 रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
हे ही वाचा-कारमध्ये स्फोटकं: ते धमकीचं पत्र फडणवीसांनी विधानसभेत वाचलं, पाहा VIDEO
2020 मध्ये स्वातंत्र्याची 73 वर्षे पूर्ण झाली. यावेळी भाषणादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 75 व्या स्वातंत्र्य दिनाचा सुवर्ण महोत्सव लक्ष्य केल्याचं आवाहन केलं होतं. यावेळी मोदी म्हणाले होते की, दोन वर्षांनंतर देश स्वातंत्र्यांचा सुवर्ण महोत्सवी वर्ष साजर करीत असेल. 2022 मध्ये देशाच्या स्वातंत्र्यांच्या 75 व्या वर्षात पदार्पण करेल. यावेळी ते असंही म्हणाले होते की, ही दोन वर्ष आपल्याला आपले संकल्प पूर्ण करण्यासाठी कठीण परिश्रम घ्यावे लागतील.