महाराष्ट्रात युती सरकारची चर्चा; पुन्हा शिवसेना-भाजप सरकार येणार?

Shiv Sena-BJP alliance news: राज्यात पुन्हा शिवसेना-भाजपची सत्ता येणार असल्याची चर्चा सोशल मीडियात रंगली आहे.

Shiv Sena-BJP alliance news: राज्यात पुन्हा शिवसेना-भाजपची सत्ता येणार असल्याची चर्चा सोशल मीडियात रंगली आहे.

  • Share this:
    मुंबई, 18 जून: महाराष्ट्रात सर्वात जुने मित्र पक्ष असलेले शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप (BJP) यांच्यात सत्ता स्थापनेवरुन झालेल्या वादानंतर युती (Yuti) तुटली. त्यानंतर शिवसेनेने आपल्या विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत मिळून सत्ता स्थापन केली. मात्र, असे असताना आता सोशल मीडियात एक जोरदार चर्चा रंगली आहे आणि ती म्हणजे शिवसेना-भाजपची पुन्हा राज्यात सत्ता येणार (Will Shiv Sena BJP government come again). याच संदर्भात न्यूज 18 लोकमतने शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली आहे. महाराष्ट्रात पुन्हा युतीचं सरकार येणार असल्याची चर्चा रंगली असून त्यावर भाजपचे नेते राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं, ही बातमी जी पसरवली जात आहे त्यात कोणतंही तथ्य नाहीये. अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव भाजपकडून कोणत्याही राजकीय पक्षाला सादर करण्यात आलेला नाहीये. सध्या महाराष्ट्र सरकारवर जे वसुलीचे आरोप लागत आहेत त्या परिस्थितीतून महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष विचलित करण्याच्या दृष्टीकोनातूनच अशा प्रकारच्या अफवा पसरवण्याचा प्रयत्न होत आहे. महाराष्ट्राच्या जनतेला माझी विनंती आहे की, अशा अफवांवर विश्वास न ठेवता सक्षम विरोधी पक्ष म्हणून भाजपला साथ देवून सरकारकडून अपेक्षित आहेत ती कामे आपण करुन घेऊ. आगामी निवडणुका स्वबळावर लढणार की शिवसेनेसोबत? राजेश टोपेंनी दिली महत्त्वाची माहिती शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांनी यावर म्हटलं, ज्या-ज्या वेळी आघाडी भक्कम होते आणि चांगले संकेत मिळतात. 10 जून रोजी पवार साहेबांनी शिवसेनेचं कौतुक केलं आणि ही आघाडी पाच वर्षे राहणार म्हटलं. त्यात कुठेतरी अशा प्रकारच्या बातमीच्या माध्यमातून थोडा संभ्रम निर्माण कऱण्याचा प्रयत्न काहीजण करत असतात. या बातमीत काहीही तथ्य नाहीये. आपण सर्वांनीच पाहिलं असेल महाविकास आघाडी सरकारमधील सर्व पक्ष आणि नेते मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा प्रयत्न करत आहेत. सोशल मीडियात रंगलेल्या या चर्चेला शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी दुजोरा दिलेला नाहीये. तसेच या वृत्तात तथ्य नसल्याचंही स्पष्ट केलं आहे.
    Published by:Sunil Desale
    First published: