सत्ता गेल्याने अनेकांना पोटदुखी, त्यांना राजकीय औषध देणार; उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वर्धापन दिनाच्या निमित्ताने संबोधित करताना भाजपवर टीका केली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वर्धापन दिनाच्या निमित्ताने संबोधित करताना भाजपवर टीका केली.

  • Share this:
    मुंबई, 19 जून: शिवसेनेच्या आज 55 व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिक आणि पदाधिकांना संबोधित केलं. यावेळी उद्धव ठाकरेंनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. उद्धव ठाकरेंनी स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेसला सणसणीत टोला लगावला तर आहेच त्यासोबतच विरोधी पक्षात असलेल्या भाजपवरही घणाघात केला आहे. पाहूयात उद्धव ठाकरेंनी नेमकं काय म्हटलं आहे. द्यायचं तेव्हा राजकीय औषध देईन गेली दीड वर्ष किती काम झालं, काय काम झालं हे आपलं काम बोलत आहे. अनेकांना त्यामुळे पोटदुखी होत आहे. सत्ता नाही म्हणून जीव कासावीस होत आहे. ते त्यांच बघून घेतील. त्यांच्या दुखण्यावर इलाज करणारा मी डॉक्टर नाहीये. राजकीय औषध द्यायचं तेव्हा राजकीय औषध देईन असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. "आम्ही देखील स्वबळाचा नारा देऊ; स्वबळ हे अभिमानाचं, स्वाभिमानाचं असावं" राजकीय पक्षांचे रंग आणि अंतरंग पाहिले गेली 55 वर्षे शिवसेना अनेक राजकीय पक्षांचे रंग आणि अंतरंग पाहून पुढे-पुढे चालली आहे. आम्ही अनेकांचे रंग आणि अंतरंग पाहिले आहेत. बाहेर काय असतं आणि आत काय असतं ते ही पाहिलं आहे असं म्हणतही उद्धव ठाकरेंनी भाजपला टोला लगावला आहे. घराबाहेर न पडताही काम होऊ शकतात हे दाखवलं आता जे काही कौतुक केलं जात आहे हे माझं कौतुक नाहीये. तुमच्यासारखे शिवसैनिक लाभणं ही माझी पुण्याई आहे. तुम्ही जर माझ्यासोबत नसता तर मी एक पाऊलही पुढे जाऊ शकणार नाही. प्रशासन उत्तमरितीने काम करत आहे. अनेकजण माझ्यावर टीका करतात की घराबाहेर पडतच नाही. नाही पडत पण घराबाहेर न पडता काम होत असेल तर घराबाहेर पडून किती काम होईल?
    Published by:Sunil Desale
    First published: