Shiv Sena Foundation Day: रक्तपात नाही तर रक्तदान करणारे शिवसैनिक ही ओळख - उद्धव ठाकरे

Shiv Sena Foundation Day: शिवसेना पक्षाचा आज वर्धापन दिन आहे. हा वर्धापन दिन कोरोनाच्या संकटामुळे व्हर्च्युअल स्वरूपात पार पडला.

Shiv Sena Foundation Day: शिवसेना पक्षाचा आज वर्धापन दिन आहे. हा वर्धापन दिन कोरोनाच्या संकटामुळे व्हर्च्युअल स्वरूपात पार पडला.

  • Share this:
    मुंबई, 19 जून: शिवसेना पक्षाचा आज (19 जून 2021) रोजी 55 वा वर्धापन दिन (Shiv Sena Foundation Day) आहे. दरवर्षी पक्षाचा वर्धापन दिन मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मात्र, कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी प्रमाणे यंदाचाही वर्धापन दिन हा साधेपणाने आणि व्हर्च्युअल स्वरुपात पार पडला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे शिवसैनिक, पदाधिकाऱ्यांसोबत ऑनलाईन पद्धतीने संवाद साधला. उद्धव ठाकरे यांच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे कुणी स्वबळावर सत्ता आणू म्हटलं तर लोक जोड्याने मारतील विकृत राजकारण करत राहिलो तर आपलं काहीही खरं नाही सत्तेसाठी लाचार होणार नाही हे आमचं व्रत शिवसेना भवनासमोरील राड्यावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया रक्तपात नाही तर रक्तदान करणारे शिवसैनिक ही ओळख शिवसैनिक कधीही खचला नाही घराबाहेर न पडताही काम होऊ शकतात हे दाखवलं सत्तेसाठी देशात राजकारणाचं विद्रुपीकरण सुरू आहे बंगाली माणसांनी निर्भिडपणे मतं मांडलं, स्वत्व काय असतं हे बंगालने दाखवून दिलं प्रादेशिक अस्मिता कशी जपायची याचं उदाहरण बंगालने घालून दिलं ममतांनी ताकद दाखवून दिली, त्याला स्वबळ म्हणतात संकट येतात तेव्हा शिवसेना पुढे सरसावते मराठी माणसाच्या हक्कासाठी आमचा लढा कायम हिंदुत्व हे काही पेटंट नाहीये हिंदुत्वावर आलेलं संकट आम्हाला चालत नाही हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व, नंतर प्रादेशिक अस्मिता हिंदुत्वासाठी मी जरुर लढेल महाविकास आघाडीच्या कामाने अनेकांना पोटदुखी सत्ता गेल्याने अनेकांना पोटदुखी झाली आहे, अनेकांना पोटशूळ झाला आहे निवडणुका येतात आणि जातात स्वबळ हे अभिमानाचं, स्वाभिमानाचं असावं, उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला टोला स्वबळ केवळ निवडणुका लढवण्यासाठी असू नये स्वबळावर लढणं हा आमचा हक्क आहे आम्ही देखील स्वबळाचा नारा देऊ समोर गर्दी, घोषणा, टाळ्या नसतील तर भाषण करण कठीण होतं सत्ता नाही म्हणून काहींचा जीव कासाविस होतोय अनेक पक्षांचे रंग आणि अंतरंग शिवसेनेने पाहिले गेले 55 वर्षे अनेकांचे रंग पाहिले गेली दोन वर्षे वेगळ्या पद्धतीने वर्धापन दिन साजरा करत आहोत शिवसेनेचा वर्धापन दिन, मार्मिकचा वर्धापन दिन आपण दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करतो मात्र, आता कोविडमुळे साधेपणाने करावा लागत आहे - उद्धव ठाकरे कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम आहे आणि त्यामुळेच गेल्यावर्षी सारखा यंदाही वर्धापन दिन साधेपणाने आणि नियमांचे पालन करून करावे अशा सूचना पक्षाकडून देण्यात आल्या होत्या. त्यानुसार शिवसेनेच्या सर्व शाखा आणि मध्यवर्ती कार्यालयांत मोजक्या शिवसैनिकांच्या उपस्थितीत सकाळी भगवा ध्वज फडकवून छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली.
    Published by:Sunil Desale
    First published: