"आम्ही देखील स्वबळाचा नारा देऊ; स्वबळ हे अभिमानाचं, स्वाभिमानाचं असावं" उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला टोला

Uddhav Thackeray on Congress: शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांसोबत संवाद साधताना काँग्रेसला सणसणीत टोला लगावला आहे.

Uddhav Thackeray on Congress: शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांसोबत संवाद साधताना काँग्रेसला सणसणीत टोला लगावला आहे.

  • Share this:
    मुंबई, 19 जून: गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस पक्षा (Congress Party)कडून आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा नारा दिला जात आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी तसं जाहीर वक्तव्य सुद्धा केलं आहे. स्वबळावर निवडणुका लढण्याच्या या नाऱ्यावरुन आता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काँग्रेस पक्षाला सणसणीत टोला लगावला आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तमाम शिवसैनिकांना ऑनलाईन माध्यमातून संबोधित केलं. यावेळी उद्धव ठाकरेंनी स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेस पक्षाला टोला लगावला आहे. स्वबळावर लढणं हा आमचा हक्क उद्धव ठाकरेंनी आपल्या संबोधनात म्हटलं, अनेक पक्ष स्वबळाचा नारा देत आहेत. स्वबळ केवळ निवडणुका लढवण्यासाठी असू नये. स्वबळ हे अभिमानाचं, स्वाभिमानाचं असावं. आम्ही देखील स्वबळाचा नारा देऊ, स्वबळावर लढणं हा आमचा हक्क आहे. ममतांनी ताकद दाखवून दिली, त्याला स्वबळ म्हणतात निवडणुका येतात आणि जातात. ममतांनी ताकद दाखवून दिली, त्याला स्वबळ म्हणतात. बंगाली माणसांनी निर्भिडपणे मतं मांडलं, स्वत्व काय असतं हे बंगालने दाखवून दिलं. प्रादेशिक अस्मिता कशी जपायची याचं उदाहरण बंगालने घालून दिलं. उद्धव ठाकरे यांच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे कुणी स्वबळावर सत्ता आणू म्हटलं तर लोक जोड्याने मारतील विकृत राजकारण करत राहिलो तर आपलं काहीही खरं नाही सत्तेसाठी लाचार होणार नाही हे आमचं व्रत शिवसेना भवनासमोरील राड्यावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया रक्तपात नाही तर रक्तदान करणारे शिवसैनिक ही ओळख शिवसैनिक कधीही खचला नाही घराबाहेर न पडताही काम होऊ शकतात हे दाखवलं सत्तेसाठी देशात राजकारणाचं विद्रुपीकरण सुरू आहे बंगाली माणसांनी निर्भिडपणे मतं मांडलं, स्वत्व काय असतं हे बंगालने दाखवून दिलं प्रादेशिक अस्मिता कशी जपायची याचं उदाहरण बंगालने घालून दिलं ममतांनी ताकद दाखवून दिली, त्याला स्वबळ म्हणतात संकट येतात तेव्हा शिवसेना पुढे सरसावते मराठी माणसाच्या हक्कासाठी आमचा लढा कायम हिंदुत्व हे काही पेटंट नाहीये हिंदुत्वावर आलेलं संकट आम्हाला चालत नाही हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व, नंतर प्रादेशिक अस्मिता हिंदुत्वासाठी मी जरुर लढेल महाविकास आघाडीच्या कामाने अनेकांना पोटदुखी सत्ता गेल्याने अनेकांना पोटदुखी झाली आहे, अनेकांना पोटशूळ झाला आहे निवडणुका येतात आणि जातात स्वबळ हे अभिमानाचं, स्वाभिमानाचं असावं, उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला टोला स्वबळ केवळ निवडणुका लढवण्यासाठी असू नये स्वबळावर लढणं हा आमचा हक्क आहे आम्ही देखील स्वबळाचा नारा देऊ समोर गर्दी, घोषणा, टाळ्या नसतील तर भाषण करण कठीण होतं सत्ता नाही म्हणून काहींचा जीव कासाविस होतोय अनेक पक्षांचे रंग आणि अंतरंग शिवसेनेने पाहिले गेले 55 वर्षे अनेकांचे रंग पाहिले गेली दोन वर्षे वेगळ्या पद्धतीने वर्धापन दिन साजरा करत आहोत शिवसेनेचा वर्धापन दिन, मार्मिकचा वर्धापन दिन आपण दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करतो मात्र, आता कोविडमुळे साधेपणाने करावा लागत आहे - उद्धव ठाकरे
    Published by:Sunil Desale
    First published: