स्नॅक्स सेंटरच्या नावाखाली सुरू होतं भलतंच काही, तरुण-तरुणींसाठी 'बंद कॅबिन'

स्नॅक्स सेंटरच्या नावाखाली सुरू होतं भलतंच काही, तरुण-तरुणींसाठी 'बंद कॅबिन'

पोलिसांनी छापा टाकला असता ओम साई राम कोल्ड्रिंक्स आणि स्नॅक्समध्ये वेश्याव्यवसाय सुरु असल्याचे उघडकीस आले

  • Share this:

कल्याण,6 डिसेंबर: उल्हासनगर येथील चांदीबाई महाविद्यालयाजवळ एका स्नॅक्स सेंटरमध्ये अनैतिक प्रकार सुरू असल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी छापा टाकला असता ओम साई राम कोल्ड्रिंक्स आणि स्नॅक्समध्ये वेश्याव्यवसाय सुरु असल्याचे उघडकीस आले. महाविद्यालयीन तरुण आणि तरुणींसाठी बंद कॅबिन बनवली असून या कॅबिनमध्ये तरुण-तरुणी अश्लील चाळे करत होते. स्नॅक्स सेंटर मालक तासभराचे 200 ते 300 रुपये आकारत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी स्नॅक्स सेंटर मालकाला अटक केली आहे.

असा झाला भंडाफोड...

उल्हासनगर येथे एका 16 वर्षीय विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी एका तरुणाला पोलिसांनी अटक केली होती. संदेश साबळे (21), असे आरोपीचे नाव असून तो जिन्सच्या कारखान्यात काम करतो. आरोपीने स्नॅक्स सेंटरमध्ये बनवलेल्या कॅबिनमध्ये विद्यार्थिनीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे कबुल केले. त्यावरून स्नॅक्स सेंटरचा भंडाफोड झाला. पोलिसांच्या तपासात समोर येताच स्नॅक्स स्टॉल मालकाला पोलिसांनी गजाआड केले आहे. हे स्नॅक्स सेंटर चांदीबाई महाविद्यालयाच्या बाजूला असल्याची माहिती समोर आली आहे.

चांदीबाई महाविद्यालयाजवळ असलेले ओम साई राम कोल्ड्रिंक्स आणि स्नॅक्स कॉर्नरमध्ये महाविद्यालयीन तरुण आणि तरुणीसाठी बंद कॅबिन बनवली आहे. या कॅबिनमध्ये एका तासासाठी 200 ते 300 रुपये घेतले जात होते. पोलिसांनी छापा टाकला असता ओम साई राम कोल्ड्रिंक्स आणि स्नॅक्स सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय सुरु असल्याचे उघडकीस आले. स्नॅक्स सेंटरचा मालक मालक ललन शाह याला अटक करण्यात आली आहे. ललन शाहचा हा गोरखधंदा मागील 10 वर्षांपासून करत होता, अशी माहिती पोलिस चौकशीत समोर आली आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: December 6, 2019, 10:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading