भांडता भांडता प्रियकराने प्रेयसीसमोरच वाशीच्या खाडीपुलावरुन मारली उडी, पण...

भांडता भांडता प्रियकराने प्रेयसीसमोरच वाशीच्या खाडीपुलावरुन मारली उडी, पण...

प्रियकराने थेट पुलावरून खाली उडी मारल्याचे पाहून प्रेयसीला देखील चक्कर येऊन पुलावरच पडली.

  • Share this:

नवी मुंबई, 27 जानेवारी : प्रियकर (boyfriend) आणि प्रेयसीमध्ये (Girlfriend) या ना त्या कारणावरून भांडण होणे नवीन नाही. पण, भांडण सुरू असताना संतापलेल्या एका प्रियकराने प्रेयसीसमोरच वाशीच्या खाडीपुलावरून (vashi creek bridge news) उडी मारल्याची घटना नवीन मुंबईत घडली आहे. सुदैवाने पोलीस आणि मच्छीमारांनी धाव घेऊन या तरुणाचा जीव वाचवला.

नवी मुंबईतील  वाशी खाडीपुलावर मंगळवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. रवी रेड्डी असं या तरुणाचं नाव आहे. तो मानखुर्द इथं राहणार आहे.

या महिलेनं 20 वर्ष करत असलेली नोकरी सोडत सुरू केला बिझनेस, आज आहे करोडपती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  रवी रेड्डी आणि त्यांची प्रेयसी दोघे वाशी खाडीपुलावर भांडत होते. दोघांमध्ये कुठल्या तरी मुद्यावरून कडाक्याचे भांडण झाले होते. भांडता भांडता रवी रेड्डी याने थेट खाडीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हे पाहून तरुणीला देखील चक्कर येऊन पुलावरच पडली. पुलावर पडलेल्या या मुलीला पाहून पुलावरून जाणाऱ्या वाहनधारकांनी पोलिसांना सांगितले.

'लाठीकाठी बरोबर ठेवा’, शेतकरी नेत्याचा खळबळजनक VIDEO व्हायरल

त्यावेळी ड्युटीवर असणाऱ्या वाहतूक पोलीस आणि वाशी पोलीस ठाण्याच्या दोघा कर्मचाऱ्यांनी कोळी बांधव महेश सुतार यांच्या मदतीने लागलीच होडीच्या माध्यमातून शोध मोहीम सुरू केली. तेव्हा रवी रेड्डीचे शरीर पाण्यावर तरंगत असल्याचे दिसले. लागलीच तरुणाला होडीत घेऊन त्याच्या शरीरात शिरलेलं पाणी बाहेर काढल्यामुळे या तरुणाचे जीव वाचला.

यापूर्वी अनेकांचे जीव वाचवणाऱ्या महेश सुतार याचे पोलिसांनी कौतुक केले आहे. तर फोन येताच क्षणाचा ही विलंब न करता घटनास्थळी धाव घेणारे पोलीस कदम, खोत, दराडे आणि होमगार्ड जवान पाटील यांचे देखील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.

Published by: sachin Salve
First published: January 27, 2021, 11:50 AM IST
Tags:

ताज्या बातम्या