मुंबईकरांना दिलासा, पाणीकपात पुढे ढकलली, 'या' कालावधीत 10 टक्के कपात

मुंबईकरांना दिलासा, पाणीकपात पुढे ढकलली, 'या' कालावधीत 10 टक्के कपात

बृहन्‍मुंबई महानगरपालिकेकडून 10 टक्‍के होणारी पाणीकपात आठवडाभर पुढे ढकलण्यात आली आहे.

  • Share this:

स्वाती लोखंडे (प्रतिनिधी) मुंबई, 03 डिसेंबर: मुंबई महापालिकेनं आठवडाभर पाणीकपात पुढे ढकलल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पिसे उदंचन केंद्रात दुरुस्तीसाठी महापालिकेनं 7 दिवस 10 टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान 3 ते 9 डिसेंबरऐवजी आता 7 ते 13 डिसेंबर अशी एक आठवडा पाणीकपात करण्यात येणार आहे. या दिवसांमध्ये पिसे उदंचन केंद्रात न्‍यूमॅटिक गेट सिस्टिमची दुरुस्‍ती करण्‍यात येणार आहे. पाणीकपातीच्‍या कालावधीत कमी दाबाने पाणीपुरवठा देखील होऊ शकतो. तथापि, दुरुस्‍ती कामाची आवश्‍यकता लक्षात घेता, नागरिकांनी कपात कालावधीत सहकार्य करावे तसेच एक दिवस आधी पुरेसे पाणी साठवून ठेवावे असे पालिका प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलं आहे.

वाचा-BCCI च्या पॉलिसीमुळे 17 जणांना घ्यावी लागणार निवृत्ती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं त्यांना अभिवादन करण्यासाठी देभरातून लाखो अनुयायी मुंबईत येत असतात. मुंबईत येणाऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून ही कामं आठवडाभर पुढे ढकलण्याचा निर्णय पालिकेनं घेतला आहे. त्‍या अनुषंगाने बृहन्‍मुंबई महानगरपालिकेनं नियोजित कालावधितील पाणी कपात पुढे ढकलली असून ती आता शनिवार, 7 ते शुक्रवार, 13 डिसेंबर 2019 या कालावधीत होणार आहे. या कालावधीमध्ये पिसे उदंचन केंद्रात वेगवेगळी काम आणि दुरुस्तीही करण्यात येणार आहे.

मुंबईकरांना एक आठवडा दिलासा मिळाला तरीही पुढील आठवड्यात मुंबईत पाणीकपात होणार असल्यानं नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 3, 2019 09:28 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading