पुढच्या 48 तासांत महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर धडकणार ‘हिका’ चक्रीवादळ, 120 किमी वेगाने असतील वारे!

पुढच्या 48 तासांत महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर धडकणार ‘हिका’ चक्रीवादळ, 120 किमी वेगाने असतील वारे!

अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याने हे चक्रिवादळ निर्माण झालं आहे. ताशी 120 किमी वेगाने वारे वाहतील असं हवामान खात्याने म्हटलं आहे.

  • Share this:

मुंबई 31 मे: पश्चिम बंगालमध्ये ‘अम्फान’ चक्रिवादळाने तांडव निर्माण केलं होतं. त्यातून सावरत असतानाच आता महाराष्ट्राला ‘हिका’ चक्रिवादळाचा धोका निर्माण झालाय. पुढच्या 48 तासांत हे वादळ महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनाऱ्यावर धडकणार आहे. सिंधुदूर्ग आणि कोकण किनारपट्टीवरून हे वादळ जाणार असून गुजरातच्या किनारपट्टीलाही धोका असल्याचं हवामान खात्याने म्हटलं आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याने हे चक्रिवादळ निर्माण झालं आहे. ताशी 120 किमी वेगाने वारे वाहतील असं हवामान खात्याने म्हटलं आहे. किनारपट्टीवर राहणाऱ्या लोकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. तर मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असंही हवामान खात्याने म्हटलं आहे. 3 जूनच्या सुमारास हे वादळ गुजरातमधून महाराष्ट्रात येईल असंही हवामान खात्याने म्हटलं आहे.

या आधी ‘अम्फान’ वादळाने ओडिशा आणि पश्चिम बंगालला झोडपून काढलं. यात पश्चिम बंगालमधल्या तीन जिल्ह्यांना जबर तडाखा बसला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या जिल्ह्यांची हवाई पाहणी केली होती. सर्व देश कोरोनाशी लढत असतानाच आता हे नवं संकट आल्याने सरकारवरचा ताण वाढला आहे.

दरम्यान, ओडिसा आणि पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात विनाश केल्यानंतर सुपर चक्रीवादळ 'अम्फान' (Super Cyclone Amphan) बांगलादेशच्या दिशेनं गेलं. बंगालमध्ये (West Bengal) अम्फानमुळे 72 लोकांचा मृत्यू झाला तर दोन जिल्हे पूर्णपणे उध्वस्त झाले. ओडिशामध्येही बरेच नुकसान झालं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज पश्चिम बंगाल आणि ओडिशामधील चक्रवाती वादळ अम्फानमुळे प्रभावित भागांचा दौरा केला.

कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर तब्बल 57 दिवसांनी मोदी दिल्लीतून बाहेर पडले. तब्बल 59 दिवस लोकं घरांमध्ये कैद होते. दरम्यान, पंतप्रधान दिल्लीत मुक्काम करतात. या दिवसांत, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी देशातील आंतरराष्ट्रीय बैठकांमध्ये भाग घेतला. आज पहिल्यांदाच मोदी दिल्लीबाहेर पडले. लॉकडाऊनपूर्वी पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेशातील प्रयागराज आणि चित्रकूट येथे 83 दिवसांपूर्वी 29 फेब्रुवारी रोजी अखेरचा दौरा केला होता.

 

 

First published: May 31, 2020, 9:39 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading