नवी दिल्ली, 27 जानेवारी: आजकाल विविध वस्तू आणि सेवा खरेदी करण्यासाठी क्रेडिट कार्डचा (Credit Card) वापर केला जातो. आपल्याला आवश्यक सेवा खरेदी करून आरामात नंतर तिचे पैसे देणं, क्रेडिट कार्डमुळे सहज शक्य झालं आहे. क्रेडिट कार्डचं बील (Credit Card Bill) तुम्ही मासिक हप्त्यामध्ये (EMI) देखील भरू शकता. पण बील भरण्यासाठी जर तुम्ही EMI चा पर्याय निवडत असाल तर तुम्ही काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे.
तुम्ही क्रेडिट कार्डची असणारी थकित रक्कम कर्जामध्ये रुपांतरीत करू शकता. जेणेकरून तुम्हाला ही थकबाकी फेडण्यासाठी अधिक कालावधी मिळेल. यामुळे क्रेडिट स्कोअरवर देखील कमी परिणाम होतो. जे ग्राहक वेळेमध्ये क्रेडिट कार्ड बील भरू शकत नाहीत, त्यांच्यासाठी ही बेस्ट पर्याय आहे.
बँकेला द्यावे लागेल व्याज
जर तुम्ही क्रेडिट कार्ड बील निश्चित वेळेआधी भरले तर तुम्हाला कोणतेही अतिरिक्त शुल्क द्यावे लागत नाही. मात्र जर तुम्ही बिलाची रक्कम EMI मध्ये बदलली तर बँकेला व्याज द्यावे लागेल.
(हे वाचा-पूर्ण करा गाडी घेण्याचं स्वप्न, Second Hand कारवर स्वस्त कर्ज देत आहेत या बँका)
ग्राहकांना द्यावे लागते हे शुल्क
जर तुम्ही EMI द्वारे तुमचे क्रेडिट कार्ड बील भरणार असाल तर काही प्रकारचे शुल्क तुम्हाला द्यावी लागतात. यामध्ये व्याजाशिवाय प्रोसेसिंग फी, प्रीपेमेंट चार्ज आणि जीएसटी देखील आकारला जातो, ज्याचे पेमेंट ग्राहकांना करावे लागते.
EMI एक चांगला पर्याय
जरी वरील शुल्क तुम्हाला द्यावे लागत असले, तरीही EMI एक चांगला पर्याय आहे. कारण एकाच वेळी तुमची मोठी रक्कम एखादी वस्तू घेण्यासाठी खर्च होत नाही. पण EMI चा पर्याय निवडताना शक्यतो कमी कालावधीचा निवडावा, कारण दीर्घ कालावधीसाठी तुम्हाला अधिक रक्कम चुकती करावी लागू शकते-त्यावर व्याज अधिक आकारले जाते.
(हे वाचा-ही बँक देत आहे खास सुविधा, आयुष्यभरासाठी Credit Card मोफत तर मिळतील या ऑफर्स)
आपात्कालीन परिस्थितीमध्येच करा रुपांतरीत
क्रेडिट कार्ड होल्डरला हे ध्यानात घेणे आवश्यक आहे क्रेडिट कार्ड बील तुम्ही आपात्कालीन परिस्थितीतच EMI मध्ये बदला किंवा तुम्हाला बील भरणं अजिबात शक्य नसेल तर. अन्यथा तुम्हाला अधिक खर्च करावा लागू शकतो. उत्तम हेच आहे की डेडलाइन आधी क्रेडिट कार्डचे बील पूर्णपणे भरून टाकावे, अन्यथा नुकसानाला सामोरे जावे लागू शकते.