एकाच वर्षात दोनवेळा दिवाळी-दसरा; या कंपनीतील कर्मचाऱ्यांना दुसऱ्यांदा पगारवाढीची घोषणा

कोरोना काळात अनेक कंपन्यांनी कर्मचारी कमी केले आहेत, तर काहींची पगार कपात करण्यात आली. या कंपनीत मात्र कर्मचाऱ्यांना दुसऱ्यांना पगारवाढ मिळाली आहे.

कोरोना काळात अनेक कंपन्यांनी कर्मचारी कमी केले आहेत, तर काहींची पगार कपात करण्यात आली. या कंपनीत मात्र कर्मचाऱ्यांना दुसऱ्यांना पगारवाढ मिळाली आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 19 जुलै : कोरोना महासाथीमध्ये जेथे (Coronavirus) अनेक कंपन्यांमधून कर्मचारी कमी केले जात आहेत, काही कंपन्यांनी तर कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढल्याचेही वृत्त समोर येत आहे. अशा परिस्थितीत अशीही एक कंपनी आहे ज्यांनी कर्मचाऱ्यांना वर्षातून दुसऱ्यांना पगारवाढ दिली आहे. कर्मचाऱ्यांचा विचार करता या कंपनीने दुसऱ्यांदा सॅलरी हाइक (Salary Hikes) ची घोषणा केली आहे. वर्षात दुसऱ्यांना पगार वाढविण्याची घोषणा ही कंपनी दुसरी तिसरी नसून आयटी क्षेत्रातील प्रसिद्ध विप्रो (Wipro) कंपनी आहे. कंपनीने शुक्रवारी याबाबत घोषणा केली आहे. त्यांनी मॅनेजरच्या पदाखालील 80 टक्के कर्मचाऱ्यांची पगारवाढ करणार आहे. ही नवी पगारवाढ या वर्षाच्या 1 सप्टेंबरपासून लागू करण्यात येईल. कंपनीने या कर्मचाऱ्यांसाठी यापूर्वी जानेवारी महिन्यात पगारवाढ (Salary Hikes) दिली होती. कंपनीने (Wipro) सांगितलं की, 'Wipro आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मेरिट सॅलरी इंक्रीज' (MSI) म्हणजेच पगारवाढ (Salary Hikes) करेल. या ब्रँडमध्ये असिस्टेंट मॅनेजर आणि त्याखालील कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. कंपनीमध्ये अशा कर्मचाऱ्यांची संख्या तब्बल 80 टक्के आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि ते दुप्पट उत्साहाने कामं करतील. हे ही वाचा-IT क्षेत्रात रोजगार कमी झाल्याचा दावा चुकीचा, यावर्षी लाखोंना मिळाल्या नोकऱ्या TCS कंपनीने देखील दोनवेळा दिली पगारवाढ कंपनीने (Wipro) सांगितलं की, त्यांनी मॅनेजर्स आणि त्यावरील कर्मचाऱ्यांसाठीदेखील पगारवाढ दिली आहे. ही वाढ (Salary Hikes) या वर्षाच्या 1 जूनपासून लागू होईल. एकाच वर्षात कर्मचाऱ्यांना दोन वेळा पगारवाढ देणाऱ्या कंपन्यांमध्ये विप्रो दुसरी कंपनी ठरली आहे. यापूर्वी टाटा कन्सलटन्सी (TCS) देखील आपल्या कर्मचाऱ्यांना जानेवारी आणि एप्रिल महिन्यात पगारवाढीची घोषणा केली होती.
    Published by:Meenal Gangurde
    First published: