SBI च्या ग्राहकांसाठी खूशखबर! YONO अ‍ॅप वापरून करा शॉपिंग

SBI च्या ग्राहकांसाठी खूशखबर! YONO अ‍ॅप वापरून करा शॉपिंग

स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे (SBI)ने डिजिटल अ‍ॅप YONO च्या माध्यमातून शॉपिंगची सुवर्णसंधी दिली आहे. SBI चा हा शॉपिंग फेस्टिवल 10 डिसेंबरपासून सुरू होईल.

  • Share this:

नवी दिल्ली, 6 डिसेंबर : स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे (SBI)ने डिजिटल अ‍ॅप YONO च्या माध्यमातून शॉपिंगची सुवर्णसंधी दिली आहे. SBI चा हा शॉपिंग फेस्टिवल 10 डिसेंबरपासून सुरू होईल. या फेस्टिवलचा लाभ 14 डिसेंबरपर्यंत घेता येणार आहे. SBI च्या 5 दिवसांच्या शॉपिंग फेस्टिवलमध्ये वेगवेगळ्या ऑफर्स आणि डिस्काउंट्स मिळतील.

SBI रिटेल आणि डिजिटल बँकिंगचे अधिकारी पी. के. गुप्ता यांनी सांगितलं, मागच्या वर्षीच्या चांगल्या प्रतिसादामुळे SBI YONO ने दुसऱ्यांदा हा शॉपिंग फेस्टिवल लाँच केला आहे.

होम लोन आणि ऑटो लोनवर ऑफर

SBI ने ई कॉमर्स सोबतच होमलोन आणि ऑटोलोन घेणाऱ्यांसाठीही खास ऑफर जाहीर केली आहे. ई कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर अ‍ॅमेझॉन, लाइफस्टाइल स्टोअर्स, थॉमस कुक, इज माय ट्रिप, OYO, पेपरफ्राय असे ब्रँड्स आहेत. 31 डिसेंबर 2019 पर्यंत ऑटो लोन घेणाऱ्यांसाठी कोणतीही प्रोसेसिंग फी द्यावी लागणार नाही. याच काळात SBI चं कर्ज घेतलं तर कंसोलिडेटेड प्रोसेसिंग फी वर 50 टक्के सूट मिळेल.

(हेही वाचा : फक्त 72 तासांत बिझनेस सुरू करण्यासाठी मिळणार पैसे, इथे करा अर्ज)

या शॉपिंगसाठी सवलत

SBI च्या शॉपिंग फेस्टिवलमध्ये इलेक्ट्रॉनिक, फॅशन, गिफ्टींग, ज्वेलरी, फर्निचर आणि ट्रॅव्हलवर विशेष सूट मिळेल.

हा फेस्टिव्ह सीझन बजेट फ्रेंडली व्हावा यासाठी SBI च्या क्रेडिट कार्डवरही 2500 रुपयांपर्यंत 10 टक्के सूट मिळेल. यासाठी कमीत कमी 1 हजार रुपयांचं शॉपिंग करावं लागेल.

गेल्या दोन वर्षांत SBI चं YONO अ‍ॅप चांगलंच प्रसिद्ध झालं आहे. अँड्रॉइड आणि IOS प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून हे सहज डाउनलोड होऊ शकतं.

=========================================================================================

Published by: Arti Kulkarni
First published: December 6, 2019, 5:24 PM IST
Tags: moneySBI

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading