राहुल बजाज यांच्या वक्तव्याला त्यांच्या मुलानेच घेतला आक्षेप, म्हणाले...

राहुल बजाज यांच्या वक्तव्याला त्यांच्या मुलानेच घेतला आक्षेप, म्हणाले...

राहुल बजाज यांनी सरकारबद्दल केलेलं एक वक्तव्य सध्या खूपच गाजतंय. पण त्यांचा मुलगा राजीव बजाज यांना मात्र त्यांचं म्हणणं पटलेलं नाही. या वक्तव्याबद्दल ते आपल्या वडिलांवर नाराज आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 2 डिसेंबर : बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज आणि त्यांचे वडील राहुल बजाज यांची अनेक मुद्द्यांवर वेगवेगळी मतं असतात. अलीकडेच ET अ‍ॅवॉर्डस मध्ये राहुल बजाज यांनी सरकारबद्दल केलेलं वक्तव्य खूपच गाजतं आहे. बजाज ग्रुपचे चेअरमन राहुल बजाज यांनी मोदी सरकारच्या दिग्गज मंत्र्यांसमोरच हे मोठं वक्तव्य केलं. देशात मॉब लिंचिंगचं वाढतं प्रमाण आणि त्याविरुद्ध कारवाईमध्ये उदासीनता, साध्वी प्रज्ञा यांची वादग्रस्त विधानं आणि कॉर्पोरेट क्षेत्रात असेलल्या भीतीच्या वातावरणाबद्दल राहुल बजाज यांनी इकॉनॉमिक टाइम्सच्या या कार्यक्रमात थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोरच आपलं मत मांडलं.

राजीव बजाज यांचं मत वेगळंच

असं असलं तरी त्यांचा मुलगा राजीव बजाज यांना मात्र त्यांचं हे म्हणणं पटलेलं नाही. या वक्तव्याबद्दल ते आपल्या वडिलांवर नाराज आहेत. राजीव बजाज यांना राहुल बजाज यांच्या वक्तव्याबद्दल विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले, त्यांना अशी संधी आवडते पण त्यांनी एका कॉर्पोरेट कार्यक्रमात एवढ्या संवेदनशील मुद्द्यावर बोलायला नको होतं. राहुल बजाज निर्भीडपणे बोलतात म्हणून लोकांना ते आवडतं. पण लोक दुरूनच टाळ्या वाजवतात. राहुल बजाज यांना नंतर मात्र कुणी साथ देत नाही,असंही त्यांचं म्हणणं आहे.

(हेही वाचा : कधीकाळी खाण्यासाठी नव्हते पैसे, त्यांच्याच Paytm कंपनीत होतेय मोठी गुंतवणूक)

एक वेगळी आठवण

असं असलं तरी राजीव बजाज यांनीही 2017 मध्ये एका कार्यक्रमात नोटबंदीवरून सरकारवर टीका केली होती. पण मी या निर्णयाची नीट अमलबजावणी कशी झाली नाही हे सांगितलं, असं त्यांचं म्हणणं आहे. यामुळे बजाज ऑटो आणि मला अडचणी येऊ शकतात, असं मी म्हटलं होतं, असंही ते नंतर म्हणाले. आमच्या क्वाड्रीसायकलला 8 वर्षं परवानगी मिळत नव्हती. पण मी नितीन गडकरींसह आणखी काहीजणांना भेटलो आणि परवानगी मिळाली याची आठवण त्यांनी करून दिली.

==========================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 2, 2019 04:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading