झटपट श्रीमंत होण्याचं स्वप्न भंगलं, या कंपनीने डुबवले लाखोंचे पैसे

झटपट श्रीमंत होण्याचं स्वप्न भंगलं, या कंपनीने डुबवले लाखोंचे पैसे

कमी पैसे गुंतवून झपाट्याने श्रीमंत होण्याच्या आशेने वनकॉइनमध्ये अनेक छोट्या गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवले. पण आता वनकॉइनची संस्थापक असलेली रुजा इग्नाकोवा आता बेपत्ता झाली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 2 डिसेंबर : व्हर्च्युअल करन्सी असलेल्या बिटकॉइनची क्लोन असलेल्या वनकॉइन (OneCoin) ने लाखो गुंतवणूकदारांचे पैसे डुबवले आहेत. कमी पैसे गुंतवून झपाट्याने श्रीमंत होण्याच्या आशेने वनकॉइनमध्ये अनेक छोट्या गुंतवणूकदारांनी पैसे गुंतवले. पण आता वनकॉइनची संस्थापक असलेली रुजा इग्नाकोवा आता बेपत्ता झाली आहे.

टाइम्स ऑफ इंडिया ने दिलेल्या बातमीनुसार, रुजा इग्नातोवाने 34 व्या वर्षी वनकॉइनची सुरुवात केली. तिने पीएचडीनंतर मॅकिन्से अँड कंपनीसोबतही काम केलंय. ती क्रिप्टोक्वीनसारखी स्टाइल करायची. बॉलगाउन आणि डायमंड इअररिंग्ज घालून, लाल लिपस्टिक लावून जायची. तिच्या रूपामुळे सगळेच जण मोहित व्हायचे.

काय आहे वनकॉइन?

वनकॉइन ही क्रिप्टोकरन्सी नव्हती. खऱ्या क्रिप्टोकरन्सीने व्यवहार ब्लॉकचेन रेकॉर्ड होतात. त्यामुळे यात आर्थिक गैरव्यवहार होऊ शकत नाही. बिटकॉइन खरेदी करणाऱ्या प्रत्येकाकडे बिटकॉइन ब्लॉकचेनची कॉपी असते. त्यामध्ये कोणीही बदल करू शकत नाही. पण या वनकॉइन मध्ये अशी कोणतीही ब्लॉकचेन नव्हती.

(हेही वाचा : पैसे कमवण्याची नामी संधी, या बँकेचा IPO झाला जाहीर)

सुरुवातीला हे वनकॉइन विकून आयगॉर नावाच्या एका इसमाने महिन्याला 10 लाख युरो कमवले. वनकॉइनमध्ये चांगली कमाई होतेय हे लक्षात आल्यावर ते स्वत: गुंतवणूकदार बनले. वनकॉइनमध्ये फसवणूक होतेय हे लक्षात आल्यानंतरही लोक यात पैसे गुंतवत होते. बीबीसी च्या एका बातमीनुसार, 24 नोव्हेंबरपर्यंत वनकॉइनचं ऑफिस सुरू होतं आणि लोक ही करन्सी प्रमोटही करत होते.

प्लॅस्टिक सर्जरी करून बेपत्ता

वनकॉइन सुरू करणारी ही रुडा इग्नातोवा मात्र अजूनही बेपत्ता आहे. काहीजणांनी तिला ग्रीसच्या अथेन्समध्ये एका महागड्या रेस्टॉरंटमध्ये पाहिलं होतं. आता तिने प्लॅस्टिक सर्जरी केलीय आणि ती फ्रँकफर्टमध्ये लपून बसली आहे, अशीही माहिती आहे. तिथे तिची मुलगीही राहते. रुजा इग्नाकोवाचा शोध अजूनही सुरूच आहे.

==========================================================================================

First published: December 2, 2019, 4:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading