Latest Gold Rate: हीच आहे सोनं खरेदीची संधी! मुंबई, पुण्यात भाव उतरला, हे आहेत जळगावच्या सोन्याचे ताजे दर

Latest Gold Rate: हीच आहे सोनं खरेदीची संधी! मुंबई, पुण्यात भाव उतरला, हे आहेत जळगावच्या सोन्याचे ताजे दर

Gold price today: सोन्याच्या दराने गेल्या 10 महिन्यांतला नीचांकी संख्या गाठली आहे. कुठल्या शहरात सोन्याचे दर किती होते पाहा..

  • Share this:

मुंबई, 5 मार्च: ऐन लग्नसराईच्य हंगामात सराफा बाजारातून गुड न्यूज आली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीपासून उतरणीला लागलेले सोन्याचे भाव शुक्रवारी आणखी गडगडले. त्यामुळे सोन्याच्या खरेदीसाठी हीच चांगली संधी असल्याचं सांगण्यात येत आहे. सोन्याचे प्रति तोळा दर जवळपास 600 रुपयांनी उतरले आहेत. देशांतर्गत बाजारात आज सलग आठव्या दिवशी सोन्याचे दर कमी (Gold Silver Price) झाले आहेत. जळगावच्या 24 कॅरेट सोन्याचा दर शुक्रवारी 44,811 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढा होता.

सोन्याच्या दराने  गेल्या 10 महिन्यांतला नीचांकी संख्या गाठली आहे. या काळात जवळपास 12000 रुपये प्रतितोळा एवढा भाव उतरला आहे. ऑगस्ट महिन्यात सर्वोच्च पातळीवर असलेले सोन्याचे भाव आता मार्चच्या पहिल्याच आठवड्यापासून उतरणीला लागले आहेत. गेल्या दहा दिवसात जवळपास 2000 ने उतरला आहे.

महाराष्ट्रात इतर काही शहरांपेक्षा सोन्याचा दर कमी राहिला. जळगावच्या सोन्याच्या दराची कशी उतरण गेल्या दहा दिवसात झाली पाहा..

देशांतर्गत बाजारात आज सलग आठव्या दिवशी सोन्याचे दर कमी (Gold Silver Price) झाले आहेत. शुक्रवारी एमसीएक्सवर सोन्याचे भाव 0.3% नी कमी होत 44,400 रुपये प्रति तोळा झाले आहेत.

याआधीच्या सत्रामध्ये सोन्याच्या किंमती कमी होऊन गेल्या काही महिन्यातील निच्चांकी स्तरावर पोहोचल्या होत्या. दिल्लीतील सराफा बाजारात गुरुवारी मल्टि कमोडिटी एक्सचेंजवर (MCX- Multi Comodity Exchange) सोन्याचे दर 44,589 प्रति तोळावर पोहोचले होते.

वेगवेगळ्या शहरांमध्ये असलेले सोन्याचे दर

दिल्ली: दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा दर दहा ग्रॅमला Rs 43,950 होता. 24 कॅरेटचा दर Rs 47,950 होता.

चेन्नई: 22 कॅरेट सोन्याचा दर दहा ग्रॅमला Rs 42,170 होता. 24 कॅरेटचा दर Rs 46,020 होता.

कोलकाता: 22 कॅरेट सोन्याचा दर दहा ग्रॅमला Rs 44,300 होता. 24 कॅरेटचा दर Rs 46,020 होता.

मुंबई : मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा दर दहा ग्रॅमला Rs 43,900 होता. 24 कॅरेटचा दर Rs 44,900 होता.

First published: March 5, 2021, 8:55 PM IST

ताज्या बातम्या