आताच करा चांदीमध्ये गुंतवणूक, सोन्यापेक्षा मिळेल अधिक फायदा; वाचा कसा होईल नफा

आताच करा चांदीमध्ये गुंतवणूक, सोन्यापेक्षा मिळेल अधिक फायदा; वाचा कसा होईल नफा

आतापर्यंत 2021 मध्ये चांदीतून गुंतवणुकदारांना सोन्याच्या तुलनेत (Gold Rates) अधिक नफा मिळाला आहे. चांदीची (Silver Price) यावर्षी ओपनिंग प्राइस 68,254 रुपये प्रति किलो होती, आता यामध्ये 5 टक्क्याने वाढ झाली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 मे: देशांतर्गत बाजारात गेल्या एका आठवड्यापासून सोन्याचांदीच्या किंमतीत (Gold-Silver Prices) चढ-उतार पाहायला मिळतो आहे. दरम्यान आतापर्यंत 2021 मध्ये चांदीतून गुंतवणुकदारांना सोन्याच्या तुलनेत (Gold Rates) अधिक नफा मिळाला आहे. यावर्षी सोन्याची ओपनिंग प्राइस 50,180 रुपये प्रति तोळा होती, त्या स्तरावर सध्याची किंमत 4.39 टक्के कमी आहे. याउलट चांदीच्या बाबतीत घडत आहे. चांदीची (Silver Price) यावर्षी ओपनिंग प्राइस  68,254 रुपये प्रति किलो होती, आता यामध्ये 5 टक्क्याने वाढ झाली आहे. तज्ज्ञांच्या मते चांदीचा वापर किंमती आणि औद्योगिक धातूच्या स्वरुपात अशा दोन प्रकारे केला जातो. त्यामुळे चांदीच्या किंमतीत सोन्याच्या तुलनेत अधिक तेजी पाहायला मिळाली आहे.

का सातत्याने वाढतायंत चांदीचे दर?

बांधकाम कामांमध्ये तेजी आल्याने चांदीचे दर वाढू लागले आहेत. याशिवाय चांदीच्या मागणीच्या तुलनेत कमी होणारा पुरवठा (Demand and Supply) यामुळेही भाववाढ होत आहे. रिलिगेअर कमोडिटीज लिमिटेड (RCL) च्या सुगंधा सचदेव म्हणतात की चांदी ही एक मौल्यवान धातू असून तो एक औद्योगिक धातू देखील आहे. अमेरिका (US), चीन (China) आणि युरोपियन देशामधील (European Union) अर्थव्यवस्थेत सुधारणा होत असताना चांदीची मागणी वाढत आहे. शिवाय खाण पुरवठा कमी झाल्यामुळे चांदीचे दर वाढत आहेत. त्या म्हणाल्या की, बेस मेटल कॉम्प्लेक्समध्ये ब्रॉड बेस रॅली दिसून आली आहे. सर्व बेस धातू बर्‍याच वर्षांच्या उच्च स्तरावर पोहोचले आहेत. यामुळे चांदीच्या सेंटिमेंटमध्ये सुधारणा झाली आहे.

हे वाचा-स्वस्तात करा घरखरेदी! 12 मे रोजी ही सरकारी बँक देतेय सुवर्णसंधी

वर्षअखेरपर्यंत चांदीत किती मिळेल नफा?

आयआयएफएल सिक्‍योरिटीज (IIFL Securities)  चे अनुज गुप्ता यांनी मनीकंट्रोलला दिलेल्या माहितीमध्ये असं म्हटलं आहे की, सर्व बेस मेटल कॉम्प्लेक्समध्ये तेजी आणि चीन, अमेरिका आणि यूरोपिय देशांमध्ये औद्योगिक मागणी वाढल्याने चांदीच्या मागणी आणि पुरवठ्यामध्ये मोठं अंतर निर्माण झालं आहे. सुगंधा सचदेव यांचं असं म्हणणं आहे की, मीडियम टर्ममध्ये चांदीचे दर 75,500-76,000 रुपये प्रति किलोच्या स्तरावर पोहोचू शकतात. तर दीर्घ कालावधीसाठी किंवा 2021 च्या अखेरपर्यंत दर 85,000 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे तुम्ही जर आता गुंतवणूक करून दर वाढल्यानंतर विक्री करण्याचं ठरवल्यास तुम्हाला चांगला नफा कमावता येईल. सोन्याचे दर 52,000 रुपये प्रति तोळा या स्तरावर पोहोचू शकतात. दीर्घ कालावधीसाठी दर 60 हजार प्रति तोळा या स्तरावर देखील पोहोचू शकतात.

Published by: Janhavi Bhatkar
First published: May 12, 2021, 10:45 AM IST

ताज्या बातम्या