खूशखबर! पुढच्या वर्षी भारतीयांना मिळणार सगळ्यात जास्त पगार

खूशखबर! पुढच्या वर्षी भारतीयांना मिळणार सगळ्यात जास्त पगार

भारताची अर्थव्यवस्था संकटात आहे. त्याचबरोबर बेरोजगारीचं प्रमाणही वाढत चाललंय. पण या स्थितीत एक दिलासा म्हणजे भारतीयांचा पगार पुढच्या वर्षी वाढणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 2 डिसेंबर : भारताची अर्थव्यवस्था संकटात आहे. त्याचबरोबर बेरोजगारीचं प्रमाणही वाढत चाललंय. पण या स्थितीत एक दिलासा म्हणजे भारतीयांचा पगार पुढच्या वर्षी वाढणार आहे. या पगारात सुमारे 9 टक्क्यांची वाढ होऊ शकते. त्यामुळे येणारं वर्ष हे खूशखबर घेऊन येणार, असं वाटू लागलं आहे.

आशियामध्ये भारताची बाजी

सगळ्यात आशियाई देशांच्या तुलनेत भारतातले पगार चांगले आहेत. कॉर्न फॅरी नावाच्या सॅलरी फोरकास्टमध्ये हे भाकित वर्तवण्यात आलंय. भारतातल्या कर्मचाऱ्यांना वास्तविक 5 टक्के वाढीचा लाभ मिळू शकेल. कारण ही वाढ करताना महागाईचा दरही ग्राह्य धरला जाणार आहे.

जागतिक स्तरावर फायदा

या सर्व्हेनुसार, 2020 मध्ये जागतिक स्तरावर 4.9 टक्क्यांचा फायदा होईल. यामध्येही महागाईचा दर धरला तर ही वाढ 2.8 टक्क्यांवर येईल. आशियाई देशांबद्दल बोलायचं झालं तर भारताखालोखाल इंडोनेशियाचा क्रमांक आहे. इंडोनेशियामधल्या कर्मचाऱ्यांना चांगली वेतनवाढ मिळू शकेल. त्याखालोखाल मलेशिया, चीन, कोरिया. जपान, तैवान या देशांचे क्रमांक आहेत, असं korn ferry चा अहवाल सांगतो.

(हेही वाचा : 'GDP म्हणजे बायबल-रामायण नाही', भाजपच्या या खासदारांची मुक्ताफळं)

बेरोजगारी वाढली

मोदी सरकारचा शपथविधी झाल्याझाल्या लगेचच भारतातल्या बेरोजगारीची आकडेवारी उघड झाली होती. बेरोजगारीचा दर 6.1 टक्क्यांवर गेला असून तो गेल्या 45 वर्षांतला हा नीचांक आहे. देशातली बेरोजगारी हे नव्या सरकारसमोर मोठं आव्हान आहे. त्याचबरोबर देशाचा GDP म्हणजेच सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा दरही खालावला आहे. मोदी सरकारसमोर हा GDP वाढवण्याचं आव्हान आहे. त्याचबरोबर बेरोजगारी घटवणं आणि औद्योगिक उत्पादन वाढवण्यासाठीही या सरकारला प्रयत्न करावे लागणार आहेत. या स्थितीत कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा हा अंदाज दिलासा देणारा आहे.

======================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: jobsmoney
First Published: Dec 2, 2019 07:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading