इंडियन बँकेची तब्बल 35 कोटींची फसवणूक; 'या' 3 NPA खात्यांमधून झाला फ्रॉड

इंडियन बँकेची तब्बल 35 कोटींची फसवणूक; 'या' 3 NPA खात्यांमधून झाला फ्रॉड

या तिन्ही खातेधारकांकडे मिळून सुमारे 35 कोटी 23 लाख रुपयांच्या कर्जाची थकबाकी (NPA) आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 5 मार्च : सार्वजनिक क्षेत्रातली महत्त्वाची बँक असलेल्या इंडियन बँकेनं (Indian Bank) आपल्या बँकेतील तीन खातेधारकांनी फसवणूक केल्याची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेला (Reserve Bank Of India) दिली आहे. या तिन्ही खातेधारकांकडे मिळून सुमारे 35 कोटी 23 लाख रुपयांच्या कर्जाची थकबाकी (NPA) आहे. बँकेनं शेअर बाजारांनाही (Share Markets) या खातेधारकांबाबत माहिती कळवली आहे. नियामक यंत्रणांच्या नियमानुसार बँकेनं ही कारवाई केली आहे. कर्जबुडव्या खातेधारकांची माहिती भारतीय रिझर्व्ह बँक आणि शेअर बाजार यांना कळवणे बँकांना बंधनकारक आहे. त्यानुसार, इंडियन बँकेनं दीर्घकाळ कर्ज परतफेड न केलेल्या या खात्यांची माहिती दिली आहे. गेल्या काही काळापासून थकीत कर्जाच्या संकटापासून बँकाची सुटका व्हावी यासाठी रिझर्व्ह बँक आणि सरकार यांनी कर्जबुडव्या ग्राहकांबाबत कठोर पावलं उचलली आहेत. बँकावरही अनेक बंधनं घालण्यात आली आहेत.

या खातेधारकांना केलं फ्रॉड घोषित :

इंडियन बँकेनं शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटलं आहे की, कर्ज थकवणारी ही तीन खाती एस. कुमार्स नेशनवाइड लिमिटेड (S. Kumar’s Nationwide), प्रिया लिमिटेड (Priya Limited) आणि युवराज पॉवर प्रोजेक्टस (Yuvraj Power Projects) या कंपन्यांची आहेत. या खात्यामध्ये 35 कोटी 29 लाख रुपयांची थकबाकी आहे. एस. कुमार्स नेशनवाइड लिमिटेडवर 14 कोटी 51 लाख रुपयांचे, प्रिया लिमिटेडकडं 9 कोटी 73 लाख रुपयांचे आणि युवराज पॉवर प्रोजेक्टसकडं 11 कोटी 5 लाख रुपयांचे कर्ज थकीत आहे. एस. कुमार्स नेशनवाइड लिमिटेड, प्रिया लिमिटेड या कंपन्यांनी संपूर्ण कर्ज थकवलं असून, कसलीही परतफेड केलेली नाही, तर युवराज पॉवर प्रोजेक्टस कंपनीकडं डिसेंबरअखेर 9 कोटी 60 लाख रुपयांची थकबाकी आहे.

हे ही वाचा-घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी खूशखबर! Home Loan झालं स्वस्त, 31 मार्चपर्यंत खास ऑफर

एनपीए म्हणजे काय ?

नॉन परफॉर्मिंग अॅसेट (NPA) म्हणजेच अनार्जित कर्ज. अनेकदा बँका ग्राहकांना कर्ज (Loan) देतात पण ग्राहक त्याची परतफेड करत नाहीत. मूळ मुद्दल 91 दिवसांपासून आणि व्याज 365 दिवस म्हणजे वर्षभरापासून अधिक काळ दिलेलं नसेल तर अशा कर्जांना एनपीए म्हटलं जातं. अशा कर्जांमुळं बँकांचे उत्पन्न बुडते. त्यांना तोटा होतो. जितका एनपीए जास्त तितका तोटा अधिक असतो. अशा कर्जांचे नुकसान भरून काढण्यासाठी बँकेला आपल्याच नफ्यातून तरतूद करावी लागते. त्यामुळं बँकेचा नफा घटतो. त्यामुळं बँकांच्या कामगिरीत एनपीए हा महत्त्वाचा निकष असतो.

First published: March 5, 2021, 6:20 PM IST
Tags:

ताज्या बातम्या