घर खरेदीसाठी हीच योग्य वेळ; वाचा काय आहेत बँकांचे नवे व्याजदर

घर खरेदीसाठी हीच योग्य वेळ; वाचा काय आहेत बँकांचे नवे व्याजदर

cheapest home loan rate: जर तुम्ही घर घ्यायचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. कारण आहे गृहकर्ज (Home Loan) अतिशय स्वस्त दारात तुम्हाला मिळू शकत.

  • Share this:

नवी दिल्ली, 5 मार्च  : तुम्ही घर खरेदी करू इच्छित असाल तर सध्या अगदी योग्य वेळ आहे. अशी संधी पुन्हा मिळेल न मिळेल. सध्या देशातील अनेक महत्त्वाच्या बँकांनी गृहकर्जाचे(Home loans)व्याजदर कमी केले असून,आता अतिशय स्वस्त दरात गृहकर्ज मिळू शकतं. त्यामुळं रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणुकीसाठी ही अगदी सुवर्णसंधी आहे. गृहकर्जाचे सध्याचे व्याजदर गेल्या 15 वर्षातील सर्वांत कमी व्याजदर आहेत.

देशातील सर्वांत मोठी सरकारी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेनं(State Bank of India)गृहकर्जाचे व्याजदर दहा आधारभूत अंकांनी(Basis Points)कमी केले आहेत. त्यापाठोपाठ कोटक महिंद्रा बँकेनं(Kotak Mahindra Bank)आपले गृहकर्जाचे व्याजदर कमी करून तो 6.65 टक्के केला आहे. हा व्याजदर देशात सर्वात कमी असल्याचा दावा बँकेनं केला आहे. या बँकापाठोपाठ एचडीएफसी बँकेनंही (HDFC Bank) आपल्या गृहकर्जाचा व्याजदर 5 आधारभूत अंकांनी म्हणजेच 0.05 टक्क्यांनी घटवला आहे. त्यामुळं आता स्टेट बँक, कोटक महिंद्रा बँक आणि एचडीएफसी यांच्याकडून कर्ज घेतल्यास गृहकर्जदारांना कमी व्याज भरावं लागेल. सध्या इतके कमी झालेले व्याजदर पुन्हा कधी होतील, सांगता येणार नाही. त्यामुळं या व्याजदरांकडं दुर्लक्ष करणं कठीण आहे. ही घर खरेदी करण्यासाठी अगदी योग्य संधी आहे हे नक्की.

तज्ज्ञांचे मत : निवासी मालमत्तेत (Residential Property)गुंतवणुकीसाठी योग्य वेळ :कोटक महिंद्रा बँकेचे कन्झ्युमर अॅसेटस विभागाचे प्रेसिडेंट आणि सीबीआरईच्या (CBRE) दक्षिण विभागाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अंशुमन मॅगझीन यांच्या मते, निवासी मालमत्तांच्या बाजारपेठेत सध्या जोरदार तेजी पाहायला मिळत आहे. या शेवटच्या तिमाहीत गृह विक्रीत वाढ झालेली ही आढळून आली आहे. आगामी काळात यात आणखी वाढ पाहायला मिळेल. सध्या गृहकर्जाचे व्याजदर सर्वात कमी आहेत. स्टँपड्यूटी माफ करण्यात आली आहे. सरकार अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करत आहेत. या सर्वांचा परिणाम दिसून येत आहे. गृह विक्रीला चांगलीच चालना मिळाली आहे. परवडणाऱ्या घरांच्या क्षेत्रात मागणी वाढण्याची अपेक्षा आहे.

दोन प्रकारचे व्याजदर :

बँका सध्या जे व्याज दर देत आहेत, ते दोन प्रकारचे आहेत. एक फिक्स व्याज दर (Fix Interest rate) आणि दुसरं फ्लोटिंग व्याज दर (Floating rates). फ्लोटिंग व्याजदर म्हणजे जेव्हा व्याजदर वाढतील किंवा उतरतील तेव्हा यावर परिणाम होईल. तर फिक्स दर म्हणजे व्याज दर कमी किंवा जास्त झाले तरी हा दर कर्जाची मुदत संपेपर्यंत कायम राहील. लोकांच्या प्रोफाईलनुसार ते कोणता व्याजदर घेऊ इच्छितात हे अवलंबून असतं.

स्टेट बँकेचे गृहकर्ज :

-भारतीय स्टेट बँकेनं(State Bank of India)एक मार्चपासून व्याजदर घटवले आहेत.

-31 मार्चपर्यंत कर्ज प्रक्रिया शुल्क माफ केलं आहे. हे शुल्क 0.8 ते 1 टक्क्याच्या आसपास असतं त्यामुळं एक टक्क्याची बचत होणार आहे.

-75 लाखापर्यंतच्या कर्जावर 6.70 टक्के व्याजदर आहे.

-75 लाखांपेक्षा अधिक रकमेच्या कर्जावर 6.75 टक्के व्याजदर आहे.

-सिबिल क्रेडीट स्कोअर(Credit Score)नुसार प्राधान्य दिलं जाईल.

-त्याशिवाय देशातील अनेक महत्त्वपूर्ण बँकांनीही आपले व्याजदर कमी केले आहेत. यामध्ये सरकारी आणि खासगी क्षेत्रातील आघाडीच्या बँकांचा समावेश आहे.

कोटक महिंद्रा बँकेचं गृहकर्ज :

-कोटक महिंद्रा बँकेच्या(Kotak Mahindra Bank)गृहकर्जाचा व्याजदर 6.65 टक्के आहे. पगारदार आणि व्यावसायिक लोकांसाठी हा व्याजदर लागू असेल. गृहकर्ज विभागात हे सर्वात स्वस्त कर्ज आहे.

-कोटक डीजी होम लोन्सच्या माध्यमातून कर्ज प्रक्रिया जलद गतीनं पूर्ण केली जाईल.

-स्टेट बँकेनं व्याज दर घटवताच कोटक बँकेनंही व्याज दर कमी केले आहेत. स्टेट बँकेचा व्याजदर 6.70 टक्के आहे.

-बँकांमधील स्पर्धा आणि रीझार्व्हा बँकेनं व्याजदर कमी केल्यानं गृहकर्जाचे व्याजदर गेल्या 15 वर्षांतील सर्वात कमी पातळीवर आले आहेत. कर्ज मागणी वाढवण्यासाठी बँका व्याजदर कमी करत आहेत.

-व्याजदर कर्जदाराचा क्रेडीट स्कोअर आणि लोन टू व्हेल्यू या गुणोत्तराशी निगडीत असेल.

-6.65 टक्के हा कर्ज दर गृहकर्ज आणि शिल्लक हस्तांतरीत कर्जावर लागू होईल. ‘

हे वाचा -  नोकरी करता करता सोप्या पद्धतीनं पैसे कमवा; 'हे' गुंतवणुकीचे पर्यात ठरतील फायदेशीर

एचडीएफसी बँकेचे गृहकर्ज :

-एचडीएफसी बँकेनं गृहकर्जाचे व्याजदर 5 आधारभूत अंकांनी घटवले आहेत. याचा लाभ सध्याच्या कर्जदारांनाही मिळणार आहे.

-4 मार्चपासून हा नवीन दर लागू होणार आहेत.

-या आधी स्टेट बँकेनं व्याज दर कमी केले असून,तो 6.70 टक्के आहे.

या बँकाही देत आहेत स्वस्त गृहकर्ज :

सिटी बँक - 6.75 टक्के

युनियन बँक - 6.80टक्के

पंजाब नॅशनल बँक - 6.80 टक्के

बँक ऑफ बडोदा - 6.85 टक्के

बँक ऑफ इंडिया - 6.85 टक्के

First published: March 5, 2021, 9:02 PM IST

ताज्या बातम्या