GST मध्ये मोठा बदल झाल्यास कपडे आणि जेवण महागणार, केंद्राला होईल 1 हजार कोटींचा फायदा

GST मध्ये मोठा बदल झाल्यास कपडे आणि जेवण महागणार, केंद्राला होईल 1 हजार कोटींचा फायदा

GST च्या वसुलीत घट आल्याने सरकार आता दुसऱ्या पर्यायांचा विचार करतंय. GST पॅनल महसुलात वाढ करण्यासाठी काही निर्णय घेणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 7 डिसेंबर : GST च्या वसुलीत घट आल्याने सरकार आता दुसऱ्या पर्यायांचा विचार करतंय. GST पॅनल महसुलात वाढ करण्यासाठी काही निर्णय घेणार आहे. GST चा टॅक्स स्लॅब एक टक्क्याने वाढवून तो 6 टक्के करण्याची शक्यता आहे.

महसुली साठ्यात वाढ

GST स्लॅबमध्ये बदल झाला तर महसुलात 1 हजार कोटींची वाढ होईल. या अहवालात म्हटलं आहे की, GST पॅनल या महिन्यातच राज्यांचं प्रशासन आणि अधिकाऱ्यांशी बातचीत करण्याची शक्यता आहे.

जीएसटी स्लॅबमध्ये चार स्लॅब आहेत. यामध्ये वेगवेगळ्या वस्तुंवर लावण्यात येणाऱ्या 5, 12, 18 आणि 28 टक्के टॅक्स स्लॅबचा समावेश आहे. पाच टक्के जीएसटी गरजेच्या वस्तूंवर लावला जातो. यामध्ये खाण्याचे साहित्य, कपडे इत्यादींचा समावेश आहे. ज्यावर जीएसटी लावला जातो त्यावर संपूर्ण टॅक्सच्या पाच टक्के भाग वसूल केला जातो.

VAT अंतर्गत येणाऱ्या वस्तूंचा समावेश GST मध्ये केला जाईल. याशिवाय सिगरेट, कोल्ड ड्रिंक्स वर लागणारा सेस वाढवण्याचा विचारही सरकार करतंय. ज्या वस्तूंवर GST लावण्यात आला नव्हता त्याही वस्तू GST च्या चौकटीत आणल्या जाणार आहेत. सध्याच्या या पुनर्रचनेत ऑटो सेक्टरचा समावेश करण्यात आलेला नाही. पण सिगरेट आणि कोल्ड ड्रिंक्स या वस्तूंच्या किंमतीत वाढ होऊ शकते.

GST कौन्सिलची बैठक

GST करप्रणालीत सुधारणा करण्याच्या दिशेने सरकारने पावले उचलली आहेत. GST कौन्सिलने राज्य सरकारांशी याबाबत चर्चा सुरु केली आहे. जीएसटी फेरआढाव्याबाबत कौन्सिलने पत्र पाठवले असून त्यावर राज्य सरकारांना प्रतिसाद देण्यास सांगितलं आहे. या पत्रात जीएसटी दर आणि त्यावरील संभावित दरवाढ , पर्याय आणि त्यावर राज्य सरकारांची प्रतिक्रिया देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महिनाअखेर ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. जीएसटी कौन्सिलची लवकरच बैठक होणार आहे.

(हेही वाचा : फक्त 72 तासांत बिझनेस सुरू करण्यासाठी मिळणार पैसे, इथे करा अर्ज)

गेल्या काही बैठकांमध्ये जीएसटी कौन्सिलने कर कपात करून सामान्यांना दिलासा दिला होता. रिजर्व्ह बँकेच्या ताज्या अंदाजानुसार देशात मे २०१७ मध्ये १४.४ टक्के सरासरी जीएसटी दर होता. आता तो ११.६ टक्के झाला आहे. परिणामी कर महसुलात घसरण झाली आहे. देशांतर्गत मंदीचा प्रभाव वाढु लागल्याने मागील काही महिन्यांपासून कर महसुलात घट झाली आहे.

=======================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: GSTmoney
First Published: Dec 7, 2019 10:30 AM IST

ताज्या बातम्या