शुक्रवारी सोन्याच्या किंमती वाढल्या तर चांदी उतरली, पाहा आजचे दर

शुक्रवारी सोन्याच्या किंमती वाढल्या तर चांदी उतरली, पाहा आजचे दर

शुक्रवारी सोन्या-चांदीच्या किंमतीमध्ये काहीसा बदल झाल्याचं पाहायला मिळालं. आज सोन्याच्या किंमती काहीशा वाढल्या आहेत तर चांदी स्वस्त झाली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 मे : सध्या देशामध्ये लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू आहे. यावेळी सराफा मार्केट बंद असले तरी सोन्याच्या किंमतीमध्ये काहीसा चढउतार रोज पाहायला मिळत आहे. शुक्रवारी सोन्या-चांदीच्या किंमतीमध्ये काहीसा बदल झाल्याचं पाहायला मिळालं. आज सोन्याच्या किंमती काहीशा वाढल्या आहेत तर चांदी स्वस्त झाली आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा 46996 रुपये झाली आहे. यामध्ये 108 रुपयांची वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. तर चांदीचे दर प्रति किलो 500 रुपयांनी कमी झाले आहेत. चांदीचे भाव प्रति किलो 46800 रुपये आहेत. त्याचप्रमाणे 23 आणि 22 कॅरेट सोन्याच्या किंमतीही काहीशा वाढल्या आहेत. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटवर (ibjarates.com) सोन्या-चांदीच्या अपडेटेड किंमती पाहता येतील

वायदे बाजारात किंमती वाढल्या

वायदे बाजारात शुक्रवारी सोन्याच्या किंमती 392 रुपयांनी वाढून दर 46,780 रुपये प्रति तोळा झाले आहेत. एमसीएक्स एक्चचेंजवर सोन्याच्या जूनच्या किमती 392 रुपयांनी अर्थात 0.85 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

(हे वाचा-RBI नंतर SBI देखील ग्राहकांना खूशखबर देण्याची शक्यता, लवकरच होऊ शकेल EMI कमी)

परिणामी सोन्याचे दर 46,780 रुपये प्रति तोळा आहेत. तर ऑगस्ट महिन्याच्या किंमतीमध्ये 416 रुपयांची म्हणजेच 0.89 टक्क्यांची वाढ झाल्यामुळे किंमती 46,927 रुपये प्रति तोळा आहेत.

कशी ओळखाल सोन्याची शुद्धता?

सोन्यावर हॉलमार्कचे चिन्ह आणि 999, 916 किंवा 875 असे अंक लिहीलेले असतात. याच अंकांवरून सोन्याची शुद्धता लक्षात येते. हॉलमार्कच्या चिन्हाबरोबर 999 हा अंक असेल तर सोनं 24 कॅरेट असते. 999 चा अर्थ असा आहे की यामधील सोन्याची शुद्धता 99.9 टक्के आहे. 23 कॅरेट सोन्यावर 958, 22 कॅरेट सोन्यावर 916, 21 कॅरेट सोन्यावर 875 तर 18 कॅरेट सोन्यावर 750 हे अंक असतात.

(हे वाचा-RBIच्या या निर्णयामुळे FD वर कमी फायदा मिळण्याची शक्यता, वाचा सविस्तर)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 22, 2020 06:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading