सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे भाव घटले, हे आहेत आजचे दर

सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे भाव घटले, हे आहेत आजचे दर

आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण पाहायला मिळाली. सोन्याच्या किंमती 26 रुपयांनी खालावल्या आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 6 डिसेंबर : आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण पाहायला मिळाली. सोन्याच्या किंमती 26 रुपयांनी खालावल्या आहेत. दिल्लीच्या सराफा बाजारात सोनं 38 हजार 895 रुपये प्रतितोळा झालेत. चांदीच्या किंमतींमध्येही वाढ झाली. चांदीचे भाव 45 हजार 495 रुपये प्रतिकिलो झाले.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 1 हजार 473 डॉलर आणि 16.88 डॉलर प्रति औंस झाले. अमेरिका आणि चीनमधली व्यापारचर्चा सुरळित होण्याच्या अपेक्षेने सोन्याच्या किंमतीत घट झालीय.

सोनंखरेदीचे नियम बदलले

सोन्याचे दागिने आणि कलाकृतींवर BIS हॉलमार्किंग सक्तीचं करण्यात येणार आहे. (BIS Hallmarking for Gold Jewelry)केंद्र सरकार 15 जानेवारी 2020 ला अधिसूचना जारी करणार आहे. त्यानंतर 15 जानेवारी 2021 पासून BIS हॉलमार्किंग सक्तीचं होईल.

सोन्याची खरेदी करताना कधीही हॉलमार्क ज्वेलरी घेतली पाहिजे. हे हॉलमार्किंग ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड करत असते. ग्राहकांना विकल्या जाणाऱ्या सोन्याच्या गुणवत्तेची चाचणी ही संस्था करते. ज्या सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क असेल ते सोनं शुद्ध असतं. सोन्याचे दागिने घेताना त्याच्या शुद्धतेचं प्रमाणपत्रही घेतलं पाहिजे.

(हेही वाचा : खूशखबर! फक्त एका दिवसात तुमच्या खात्यात जमा होणार पैसे, काय आहे EPFO प्लॅन?)

नियम पाळला नाही तर होणार शिक्षा

हा नियम पाळला नाही तर 1 लाख रुपये दंड आणि एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. वेगवेगळ्या शहरांतल्या सराफ संघटना बाजार सुरू होण्यापूर्वी एकत्र येऊन सोन्याचे भाव ठरवतात.त्यामुळे देशभरात प्रत्येक शहरांत सोन्याचे भाव वेगवेगळे असतात.

=================================================================================================

Published by: Arti Kulkarni
First published: December 6, 2019, 7:55 PM IST
Tags: goldmoney

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading