लगीन सराईच्या दिवसात सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ, जाणून घ्या आजचे नवे दर

लगीन सराईच्या दिवसात सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ, जाणून घ्या आजचे नवे दर

लगीन सराईच्या दिवसात सोन्याचे दर वधारल्याचं पाहायला मिळत आहे.

  • Share this:

मुंबई, 20 फेब्रुवारी: लगीन सराईच्या दिवसात सोन्याचे दर वधारल्याचं पाहायला मिळत आहे. सराफ बाजारात जवळपास 1 हजार 600 रुपयांनी सोन्याचे दर वाढले आहेत. त्यामुळे सोन्याला जरी नवी झळाळी आली असली तरी सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे. ऐन लगीन सराईच्या दिवसांमध्ये सोन्यानं चाळीशी पार केली आहे. आठवड्याच्या सुरुवातील सोनं 233 रुपयांनी स्वस्त झालं होतं तर मंगळवारी दर स्थिरावत नाहीत तोपर्यंत आज दर वधारले आहेत. आज आणि उद्या हे दर स्थिर राहतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तर चांदीचे दर सराफ बाजारात तेजीत असल्याचं पाहायला मिळत आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात 24 कॅरट सोन्याचा भाव 41,661 रुपये प्रतितोळा झाला आहे. तर चांदीसाठी प्रति किलोमागे 47 हजार 794 रुपये मोजावे लागणार आहेत. चांदीचे दर 224 रुपयांधी वधारले आहेत.

सोमवारी सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झाली होती. एक किलो चांदीचा भाव (Silver Prices)157 रुपयांनी कमी झाला होता. तर सोन्याचे भाव 233 रुपयांनी घटले होते. चीनमध्ये पसरलेला कोरोना व्हायरस नियंत्रणात आल्याने बाजारात तेजी आली आणि त्यामुळे सोनं -चांदीच्या किंमती कमी झाल्याचा HDFC सिक्युरिटीजचे सीनिअर अॅनॅलिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी सांगितलं होतं. मात्र पुन्हा एकदा सोन्या-चांदीचे दर तेजीत आल्याचं पाहायला मिळत आहे.

लगीन सराईच्या दिवसांमध्ये पुन्हा एकदा सोन्या चांदीला नवी झळाळी आली असल्यानं सोन्याचे दर वाढले आहेत.

हेही वाचा-नोकरदारांनो, पगारवाढीची अपेक्षा नकोच! यंदा Salary hike असू शकते सर्वांत कमी

हेही वाचा-राधाकिशन दमानी बनले भारतातील दुसरी सर्वात श्रीमंत व्यक्ती, दिग्गजांना टाकलं मागे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: goldsilver
First Published: Feb 20, 2020 11:49 AM IST

ताज्या बातम्या