खूशखबर! फक्त एका दिवसात तुमच्या खात्यात जमा होणार पैसे, काय आहे EPFO प्लॅन?

खूशखबर! फक्त एका दिवसात तुमच्या खात्यात जमा होणार पैसे, काय आहे EPFO प्लॅन?

तुम्हाला तुमच्या पीएफ अकाउंटमधून पैसे काढायचे असतील तर आता त्यात फार अडचणी येणार नाहीत. तुमचं PF काढण्याचं काम काही मिनिटांत पूर्ण होईल.

  • Share this:

नवी दिल्ली, 6 डिसेंबर : तुम्हाला तुमच्या पीएफ अकाउंटमधून पैसे काढायचे असतील तर आता त्यात फार अडचणी येणार नाहीत. तुमचं PF काढण्याचं काम काही मिनिटांत पूर्ण होईल. कर्मचारी भविष्य निधी संघटना पीएफ काढण्यासाठी एक यंत्रणा तयार करतेय. यासाठी EPFO एक कालावधी ठरवतंय. PF काढण्यासाठी एका दिवसांत हजारोंच्या संख्येने अर्ज येणार असल्याने ही यंत्रणा विकसित करण्यात आलीय.

एका दिवसात पूर्ण होणार प्रक्रिया

प्रॉव्हिडंड फंडाची रक्कम काढण्यासाठी अर्ज केल्यानंतर EPFO एक दिवसात ही प्रक्रिया पूर्ण करतं. यानंतर ते पैसे 3 दिवसांत तुमच्या बँक खात्यात येतात. तुम्हाला PF मधून अॅडव्हान्स पैसे काढायचे असतील तर घरबसल्या ऑनलाइन अर्जही करू शकता. EPFO च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएफ काढण्यासाठी क्लेम सेटलमेंटची प्रक्रिया आणखी सोपी केली जाणार आहे. या माध्यमातून अर्ज केला तर तुमचा पीएफ काही भागांत तुम्हाला मिळेल.

असं करा लॉगइन

EPFO च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुम्ही लॉग इन करायचं आहे. लॉग इन आयडी आणि पासवर्ड, कॅप्चा टाकून लॉगइन करा. यानंतर Manage या पर्यायावर क्लिक करा आणि पीएफ अकाउंटचं केवायसी पूर्ण आहे की नाही ते चेक करा. केवायसी चेक केल्यानंतर तुम्ही ऑनलाइन सर्व्हिस क्लेमच्या पर्यायावर क्लिक करा. यावर क्लिक केल्यानंतर ड्रॉप डाउन मेन्यूमध्ये क्लेम चा पर्याय येईल. त्यावर क्लिक करा. तुम्हाला यावर क्लिक करायचं आहे.

(हेही वाचा : SBI च्या ग्राहकांसाठी खूशखबर! YONO अ‍ॅप वापरून करा शॉपिंग)

हे 3 पर्याय वापरा

तुमचा ऑनलाइन क्लेम सबमिट केल्यावर तुम्हाला पेमेंटचा पर्याय निवडावा लागेल. यामध्ये तुम्हाला I Want To Apply For हा पर्याय निवडावा लागेल. Full EPF Settlement, EPF Part withdrawal (loan/advance) किंवा pension withdrawal च्या नावांनी 3 पर्याय असतील. तुमच्या सोयीनुसार यापैकी एखादा पर्याय निवडू शकता. यानंतर तुमच्या मोबाइल नंबरवरून OTP च्या माध्यमातून व्हेरिफाय करा. ही व्हेरिफिकेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचा अर्ज EPFO पर्यंत पोहोचेल.

=====================================================================================

Published by: Arti Kulkarni
First published: December 6, 2019, 6:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading