पन्नास पैशांचं नाणं बनवू शकते तुम्हाला लाखोपती, कसं ते वाचा सविस्तर

तुम्हालाही जुन्या नाणी (Coins) किंवा नोटा (Note) जमा करण्याची आवड असेल तर ही आवड तुम्हाला लक्षाधीश बनवू शकते, हे लक्षात घ्या.

तुम्हालाही जुन्या नाणी (Coins) किंवा नोटा (Note) जमा करण्याची आवड असेल तर ही आवड तुम्हाला लक्षाधीश बनवू शकते, हे लक्षात घ्या.

  • Share this:
नवी दिल्ली, 12 जून: तुम्हालाही जुन्या नाणी (Coins) किंवा नोटा (Note) जमा करण्याची आवड असेल तर ही आवड तुम्हाला लक्षाधीश बनवू शकते, हे लक्षात घ्या. आजकाल जुन्या नोटा, नाण्यांची मागणी खूपच वाढली आहे. अनेक दुर्मिळ नाणी, नोटा लाखो नव्हे तर कोटी रुपयांमध्ये देखील विकल्या जातात. बरेच लोक प्राचीन वस्तू खरेदी करतात. त्यात काही लोक दुर्मिळ नाणी, नोटा यांचे संग्रह असतात. आपला संग्रह अधिक समृद्ध करण्यासाठी ते सतत दुर्मिळ नाणी, नोटा यांच्या शोधात असतात. त्याकरता मोठी रक्कम मोजायला ते तयार असतात. नाणी किंवा नोटा जितक्या जुन्या, अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध असतात त्यावर त्याची किंमत ठरते. सध्याच्या काळात तर यासाठी अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्म उपलब्ध झाले आहेत. अलीकडे 50 पैशांच्या जुन्या नाण्याला मोठी मागणी आली आहे. या नाण्यासाठी लाख रुपये दयायला लोक तयार आहेत. तुमच्याकडे असं 50 पैशांचे दुर्मिळ नाणं असेल तर तुम्हीही लाखो रुपये कमवू शकता. तेव्हा तुमच्या संग्रहात आहे का बघा असं नाणं आणि शोधा तुमच्या श्रीमंतीचा मार्ग. आपल्या देशात अगदी जुन्या काळात आणेली, ढबू पैसा, भोकाचा पैसा अशी नाणी चलनात होती, नंतर पाच पैसे, दहा पैसे, वीस पैसे, 25 पैसे आणि 50 पैसे तसंच एक रुपयाचे नाणे चलनात आले. काळाच्या ओघात नोटा आल्या आणि हळूहळू नाणी चलनातून कमी होत गेली. नात्र छोट्या किंमतीच्या नोटाही गेल्या. सध्याच्या काळात एक रुपया, दोन रुपये, पाच आणि दहा रुपयाची नाणी चलनात आहेत. साधारण 2011च्या सुमारास 25 पैसे, 50 पैसे या नाण्यांचा ट्रेंड संपला. सरकारनं नाण्यांचा वापर थांबवण्यापूर्वीच लोकांनी याचा वापर थांबवला होता. त्यामुळं आताच्या काळात ही नाणी निरुपयोगी आहेत; पण हीच नाणी लक्षाधीश बनवू शकतात. नाण्याचे वैशिष्ट्य : 2011 मध्ये तयार करण्यात आलेलं हे नाणं असून, याच वर्षी या नाण्यावर बंदी घालण्यात आली. हे नाणं चलनातून बाद झालं. विक्री कुठे आणि कशी करता येते : प्रसिद्ध ऑनलाइन खरेदी-विक्री प्लॅटफॉर्म ओएलक्सवर (OLX) 50 पैशांचे स्टीलचे एक विशिष्ट नाणे एक लाख रुपयांना विकले जात आहे. तुमच्याकडेही हे नाणं असेल तर तुम्ही या वेबसाइटवर त्याची विक्री करू शकता. याकरता तुम्हाला आधी वेबसाइटवर विक्रेता म्हणून नोंदणी करावी लागेल. यानंतर, तुमच्याकडे असलेल्या नाण्याचे फोटो अपलोड करावे लागतील आणि ते विक्रीसाठी उपलब्ध असल्याचं जाहीर करावं लागेल. 10 आणि 20 रुपयांचा नोटांचाही होतो ऑनलाइन लिलाव : ओएलएक्सवर जुन्या नाणी किंवा नोटांचा लिलाव आयोजित केला जातो. तिथं जुन्या नोटाही विकल्या जातात. तुमच्याकडे एखादी दुर्मीळ नोट असेल तर तीही तुम्ही या वेबसाइटवर विकू शकता. यासाठी आधी तुमचा लॉग-इन आयडी तयार करा. तुमच्याकडे असलेल्या दुर्मीळ नोटांचा फोटो शेअर करावा लागेल.
Published by:Pooja Vichare
First published: