'बॅड टच' करणाऱ्या भामट्याचा पाठलाग करून तरुणीने शिकवला असा धडा

'बॅड टच' करणाऱ्या भामट्याचा पाठलाग करून तरुणीने शिकवला असा धडा

तरीही तरुणीने त्याला सोडले नाही. अंधेरी स्टेशनवर आरोपीला तिने जीआरीएफच्या ताब्यात दिले

  • Share this:

मुंबई,2 डिसेंबर: मुंबईत महिला आणि तरुणी किती असुरक्षित आहे, हे पुन्हा एका घटनेवरून स्पष्ट झाले आहे. एका धाडसी वकील तरुणीने 'बॅड टच' करणाऱ्या भामट्याला चांगलाच धडा शिकवला. एवढेच नाही तर त्याच्या मुसक्या आवळून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. हा भामटा तरुणीचा छेड काढत होता. पोलिसांनी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला कोर्टात हजर केले असता त्याला 14 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ही पश्चिम रेल्वेच्या दादर स्टेशनवर घडली. जावेद जान शाह (वय-32, रा. प्रभादेवी) असे आरोपीचे नाव आहे. नवी मुंबईतील एका प्रतिष्ठित महाविद्यालयात तो वैद्यकीय शिक्षण घेत आहे.

पीडित तरुणीने सांगितले की, शनिवारी ती दादर स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांर 3 वर आलेल्या लोकलच्या फर्स्ट क्लास लेडीज कंपार्टमेंटकडे जात होती. अचानक तिला मागून कोणी तरी 'बॅड टच' केला. तिने वळून पाहिले असता भामट्याने तेथून पळ काढला. तो लोकल ट्रेनमध्ये चढला. ट्रेन सुरू झाली. तरुणीने त्याचा पाठलाग करत धावत्या ट्रेनमध्ये चढून त्याची कॉलर पकडली. आरोपीने स्वत:ची सुटका करून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, तरीही तरुणीने त्याला सोडले नाही. अंधेरी स्टेशनवर आरोपीला तिने जीआरीएफच्या ताब्यात दिले.

कोणी केली नाही मदत...

आरोपी छेड काढून पळाला तेव्हा स्टेशनवर गर्दी होती. पण मदतीसाठी कोणीही धावून आले नाही. सगळ्यांनी बघ्याची भूमिका घेतली. पोलिस त्याच्या विरूद्ध गुन्हा दाखल करून घेण्यात तयार नव्हते. परंतु तरुणीने स्वत:ची ओळख वकील अशी करून दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला. आरोपीला कोर्टात हजर केले असता त्याला 14 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 2, 2019 10:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading