‘तब्लिगी’मध्ये सहभागी झालेल्यांची तपासणी करा, अशी मागणी करणाऱ्याच्या घरावर सोलापूरात हल्ला

‘तब्लिगी’मध्ये सहभागी झालेल्यांची तपासणी करा, अशी मागणी करणाऱ्याच्या घरावर सोलापूरात हल्ला

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पिंपरी आर या गावातील दहा जण निजामुद्दीनमध्ये सहभागी झाले होते.

  • Share this:

सोलापूर 31 मार्च : दिल्लीतल्या निजामुद्दीनमधील तब्लिगी जमातमध्ये देशभरातून लोक सहभागी झाले होते. त्यातल्या अनेकांना कोरोनाने ग्रासलं आहे. त्यामुळे सर्व देशभर खळबळ उडाली आहे. यात सोलापूर जिल्ह्यातल्या 10 जणांचा समावेश होता. यात सहभागी झालेल्या सर्वांची तपासणी करावी अशी मागणी बहाद्दूर पठाण यांनी केली होती. त्यामुळे काही लोकांनी त्यांच्या घरावरच हल्ला केलाय. या हल्ल्यात पठाण यांच्यासह त्यांचा मुलगा आणि पत्नी जखमी झाले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील पिंपरी आर या गावातील दहा जण निजामुद्दीनमध्ये सहभागी झाले होते. यात सहभागी झालेल्या लोकांची तपासणी करण्याची बहाद्दूर पठाण यांनी मागणी केली होती. तपासणीची मागणी केल्याबद्दल तक्रारदार पठाण यांच्या घरावर जवळपास पन्नास लोकांनी हल्ला केला. यात बहाद्दूर पठाण यांच्यासह मुलगा आणि पत्नी जखमी झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. पोलिसांनी प्रकरणाची दखल घेतली असून 10 लोकांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

देशभरात सध्या दिल्लीच्या निजामुद्दीन येथील तब्लिगी जमात परिषदेमुळे भीतीचे वातावरण आहे. 13 ते 15 मार्च दरम्यान फक्त देशातील विविध राज्यांमधूनच नव्हे तर परदेशातूनही लोकं हजर होते. भारत आणि परदेशातील लोकांसह एकूण 1830 लोक या परिषदेसाठी उपस्थित होते. 15 मार्चनंतर तब्बल 1400 लोकं दिल्लीमध्ये होते.

हे वाचा -  मक्का-मदिनेतल्या मशिदी बंद होऊ शकतात तर भारतातल्या का नाही? – जावेद अख्तर

आतापर्यंत 300 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या परिषदेतून बाहेर पडलेल्या 6 जणांचा तेलंगणात तर कर्नाटक, जम्मु काश्मीर आणि मुंबईत प्रत्येकी एक अशा 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिल्ली रुग्णालायत असणाऱ्या 35 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

हे वाचा - दिल्लीतील एका चुकीमुळे देशभरात खळबळ, मुंबईपासून-अंदमानपर्यंत पसरला कोरोना

एकीकडे या परिषदेमुळे देशभरात कोरोना पसरत असताना दुसरीकडे, अंदमानमधील 10 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या 10 पैकी 9 लोकं तब्लिगी जमात परिषदेत सहभागी झाले होते. या परिषदेत सामिल झालेले 1830 लोकं राज्याच्या विविध भागातून आले होते.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 31, 2020 10:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading