विखे पाटलांसह कोणी स्वगृही परतण्यास उत्सुक असेल तर 'वेट अ‍ॅण्ड वॉच'

विखे पाटलांसह कोणी स्वगृही परतण्यास उत्सुक असेल तर 'वेट अ‍ॅण्ड वॉच'

राधाकृष्ण विखेंबाबत थेट त्यांना विचारा की ते अस्वस्थ आहेत का, असा प्रतिसवालही केला..

  • Share this:

साहेबराव कोकणे,(प्रतिनिधी)

अहमदनगर,6 डिसेंबर: विधानसभा निवडणुकीच्या आधी राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता मात्र विखे पाटील यांच्यासह कोणी स्वगृही परतण्यास उत्सुक असेल तर 'वेट अ‍ॅण्ड वॉच', असे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि ठाकरे मंत्रिमंडळातील मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. राधाकृष्ण विखेंबाबत थेट त्यांना विचारा की ते अस्वस्थ आहेत का, असा प्रतिसवालही थोरतांनी केला आहे. तसेच जिल्ह्याच्या आणि राज्याच्या काँग्रेसच्या किल्या आपल्याकडे असल्याचेही सूचित केले. पक्ष सोडून गेलेल्यांचा निर्णय नवनेतृत्त्वाकडे गेला असल्याचेही थोरातांनी सांगितले.

बाळासाहेब थोरात हे अहमदनगरात बोलत होते. तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये डॉक्टर तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपीचा शुक्रवारी एन्काउंटर करण्यात आला. त्यावर बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, बलात्कारासारखे खटले फास्ट ट्रॅकवर चालवून त्वरित निर्णय होणे गरजेचे आहे. नराधमांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. कायद्यात त्रुटी असतील तर राष्ट्रीय पातळीवर निर्णय घ्यायला हवेत, असे मत बाळासाहेब थोरात यांनी यावेळी व्यक्त केलेय गरज असल्यास कायद्यात बदल करा, अशी आग्रही मागणी थोरात यांनी केली आहे.

अखेर बाळासाहेब थोरात यांना मिळाला शासकीय बंगला

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री सुभाष देसाई आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना अखेर शासकीय निवासस्ठान मिळाले आहे. सुभाष देसाई यांना माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा 'शिवनेरी' तर दिवाकर रावते यांचा 'मेघदूत' बंगला बाळासाहेब थोरात यांना देण्यात आला आहे. काही दिवस आधी शपथ धेतलेले मंत्री यांना शासकीय बंगला वाटप झाले होते. आता देसाई आणि थोरात यांना ही शासकीय बंगला वाटप करण्यात आला आहे. मात्र, सर्वच मंत्र्यांना खातेवाटपाची प्रतिक्षा आहे.

दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर निर्माण झालेल्या राजकीय स्थितीमुळे ऐतिहासिक महाराष्ट्र विकास आघाडीचा उदय झाला. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी या तीन पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केले. मात्र, पाच वर्षांच्या सहमतीने सरकार चालवण्याचे मोठे आव्हान या तीनही पक्षांसमोर असणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 6, 2019 09:25 PM IST

ताज्या बातम्या