फक्त 3 दिवसांतच भयानक परिस्थिती समोर; नागपूरकरांनो आता तरी आवर घाला नाहीतर...

फक्त 3 दिवसांतच भयानक परिस्थिती समोर; नागपूरकरांनो आता तरी आवर घाला नाहीतर...

नागपुरात (coronavirus in nagpur) सलग तीन दिवस नव्या कोरोना रुग्णांची धक्कादायक आकडेवारी समोर येते आहे.

  • Share this:

नागपूर, 05 मार्च : मुंबई (mumbai coronavirus), पुण्यातील (pune coronavirus) कोरोनाला आवरण्यासाठी सरकारची धडपड सुरू असताना दुसरीकडे नागपूरनंही (nagpur coronavirus cases) राज्याचं टेन्शन वाढवलं आहे. नागपुरात सलग तिसऱ्या दिवशी विक्रमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. सलग तीन दिवस नव्या कोरोना रुग्णांचा आकडा एक हजारच्या पारच आहे आणि नागपुरातील या भयानक परिस्थितीला कारणीभूत खुद्द नागरिकच आहेत.

नागपुरात गेल्या 24 तासांत 1393 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 11, 508 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नागरिकांचा बिनधास्तपणा आणि बेजबाबदारपणा भोवताना दिसतो आहे.

सरकारनं लॉकडाऊन शिथील केल्यानंतर लोकांच्या मनातील कोरोनाची भीती गेली आहे. सुरुवातीला लोक मास्क घालून, सॅनिटायझर सोबत घेऊन गरज असल्यासच बाहेर पडत असत, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत असत. पण आता मात्र लोकांच्या चेहऱ्यावर मास्क दिसत नाही. दरम्यान  जिल्हा प्रशासनानं नवी नियमावली जारी केली आहे.

कोरोनाची वाढती प्रकरणं पाहता नागपूर महापालिकेनं 22 फेब्रुवारीला लागू केलेले निर्बंध 14 मार्चपर्यंत कायम ठेवले आहेत.  महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी यांनी याबाबतची नोटीस जारी केली आहे. त्यानुसार शहरातील शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस, आठवडा बाजार आणि स्विमिंग पूल 14 मार्चपर्यंत बंद राहणार आहेत. या कालावधीत क्रीडा स्पर्धा किंवा कार्यक्रम होणार नाही. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कोणतेच कार्यक्रम होणार नाहीत.

नागपूर जिल्हा परिषद कोरोनाचा हॉटस्पॉट

या कार्यालयातील 23 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. यात शिक्षण विभागाचे सर्वाधिक 12 कर्मचारी आहे तर पाणीपुरवठा विभागाचे 6 आणि इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. आहे. यापूर्वी जिल्हा परिषदेचे 30वर अधिकारी व कर्मचारी संक्रमित झाले होते. त्यामुळे जिल्हा परिषदेने आठ दिवस लॉकडाऊनही केले होते. दरम्यान आता  12 मार्चपर्यंत  सामान्य नागरिकांना जिल्हा परिषदेमध्ये प्रवेश बंद करण्यात आले.

हे वाचा - सर्वांना मोफत मिळणार कोरोना लस? मोदी सरकार लवकरच निर्णय घेण्याची शक्यता

एखाद्याला महत्वाचे काम असेल  त्यांनी मोबाईल आणि इमेल चा वापर करावा, अशी विनंती जिल्हा परिषदचे कार्यकारी अध्यक्ष योगेश कुंभेजकर यांनी केली. जिल्हा परिषदेमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी अत्यावश्यक कामासाठी आलेल्यासाठी एक स्वतंत्र टेबल ठेवण्यात आल्याचे देखील त्यांनी सांगितले. कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्हा परिषद मुख्यालयात पसरू नये. गर्दीवर नियंत्रण राहावे यासाठी जि.प. प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केल्या आहेत.

दहा दिवसात 35 जिल्ह्यांमध्ये दुप्पट कोरोनाचा प्रसार

देशातील जवळपास 180 हून अधिक जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. यातील 34 जिल्हे असे आहेत, जिथे मागील 10 दिवसात रुग्णांच्या संख्येत थेट दुप्पटीनं वाढ झाली आहे. यात सर्वाधिक महाराष्ट्रातील 6 जिल्हे, पंजाबमधील 5, केरळ आणि गुजरातमधील प्रत्येकी 4 आणि मध्यप्रदेशमधील 3 जिल्ह्यांचा समावेश आहे.

हे वाचा - पुण्याच्या फ्लाइटमध्ये सापडला कोरोना रुग्ण; टेक ऑफ आधी सगळ्या प्रवाशांना उतरवलं

महाराष्ट्रात गुरुवारी 9 हजार 855 जणांना कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 6,559 लोक कोरोनातून बरे झाले आहेत. 42 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 21 लाख 79 हजार 185 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील 20 लाख 43 हजार 349 जण बरे झाले आहेत. तर, 52280 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 82343 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Published by: Priya Lad
First published: March 5, 2021, 6:49 PM IST

ताज्या बातम्या