आई फोनवर बोलत होती, 1 वर्षाच्या चिमुरड्या टबमध्ये बुडून करूण अंत

आई फोनवर बोलत होती, 1 वर्षाच्या चिमुरड्या टबमध्ये बुडून करूण अंत

रविवारी रात्री कुटुंबीयांनी जेवण घेतले. फुलमती अबिदला जेऊ घालतत होती. अचानक त्यांना पतीचा फोन आला.

  • Share this:

लक्ष्मण घाटोळ, प्रतिनिधी

नाशिक, 02 डिसेंबर : एक वर्षाच्या बालकाचा पाण्याच्या भांड्यात पडून दुर्दैवी अंत झाल्याची घटना उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. बाथरुममधील टबमध्ये बुडून या एक वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. उपनगर पोलीस ठाण्यात अाकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

नाशिक-पुणे महामार्गावरील आंबेडकरनगर समोरील डीजीपीनगर येथे रविवारी ही घटना घडली. पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, अबिद मोहित शेख (वय 1 वर्षे) याची मावशी डीजीपीनगर संतोषीमाता नगर येथील साईर कुटीर सोसायटीत राहते. तिची नुकतीच प्रसुती झाली. तिची बहीण फुलमती खातून ही आपला लहान मुलगा अबिदला घेऊन बहिणीच्या घरी गेली होती.

रविवारी रात्री कुटुंबीयांनी जेवण घेतले. फुलमती अबिदला जेऊ घालतत होती. अचानक त्यांना पतीचा फोन आला. फोनवर बोलत बोलत अबिदची आई बाल्कनीत गेली. आईचे दुर्लक्ष असतानाच अबिद हा बाथरुममध्ये गेला. तेथे पाण्याने भरलेला टब होता. त्यात पडून बुडून त्याचा मृत्यू झाला. अबिदच्या मृत्यूमुळे आईने एकच आक्रोश केला.

या प्रकरणी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. घडलेल्या घटनेनंतर शेख कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

Published by: sachin Salve
First published: December 2, 2019, 11:26 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading