शिवसेना @55, उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे सर्वांच्याच नजरा, शिवसैनिकांची उत्सुकता कायम

Shivsena Foundation Day: राज्याच्या राजकारणात महत्त्वाच्या आणि वेगवेगळ्या भूमिका बजावणाऱ्या शिवसेनेचे आज 55 वा वर्धापन (Shiv Sena Foundation Day) दिन आहे.

Shivsena Foundation Day: राज्याच्या राजकारणात महत्त्वाच्या आणि वेगवेगळ्या भूमिका बजावणाऱ्या शिवसेनेचे आज 55 वा वर्धापन (Shiv Sena Foundation Day) दिन आहे.

  • Share this:
    मुंबई, 19 जून: राज्याच्या राजकारणात महत्त्वाच्या आणि वेगवेगळ्या भूमिका बजावणाऱ्या शिवसेनेचे आज 55 वा वर्धापन (Shiv Sena Foundation Day) दिन आहे. आज शिवसेना 19 जून रोजी म्हणजेच आज 55 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतरचा हा दुसरा वर्धापन दिन आहे. शिवसेना (Shivsena)55 वा वर्धापन दिना निमित्त, शिवसेना पक्ष प्रमुख (Chief Minister Uddhav Thackeray) उद्धव ठाकरे आज संध्याकाळी 7 वाजता शिवसैनिकांना ऑनलाईन सोशल मीडियाद्वारे मार्गदर्शन भाषण करणार आहेत. यावेळी ते शिवसेनेची पुढील राजकीय दिशा काय असणार यावरही भाष्य करतील. कोविड 19 संसर्गाचा प्रार्दुभाव सुरू असल्यामुळे शिवसेनेचा वर्धापन दिन साधेपणानेच साजरा करण्यात येत आहे. आज दिवसभरात शिवसैनिकांना आरोग्य शिबीरांचं आणि रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्याचे आदेश शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेत. राज्यातील आणि देशातील राजकीय परिस्थिती पाहता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांना काय मार्गदर्शन करणार याकडे विरोधी पक्षांसह सर्वच प्रमख पक्षांचंही लक्ष लागलंय.
    Published by:Pooja Vichare
    First published: