कार्यकर्त्यांनी केलेला 'तो' नवस फेडण्यासाठी छगन भुजबळांचे जेजुरी दर्शन

कार्यकर्त्यांनी केलेला 'तो' नवस फेडण्यासाठी छगन भुजबळांचे जेजुरी दर्शन

समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी छगन भुजबळ यांच्यासाठी एक नवस केला होता.

  • Share this:

पुरंदर, 20फेब्रुवारी : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज तीर्थक्षेत्र जेजुरीत येऊन कुलदैवताच्या दर्शन घेतले. दुपारी साडेबारा वाजता ते मोटारीने जेजुरीत आले आणि थेट जेजुरी गडावर गेले. गडावर कुलदैवत खंडोबा म्हाळसादेवीची महापूजा अभिषेक, महाआरती केली. यानंतर तळी भांडार, सदानंदाचा जयघोष करून भंडाऱ्याची उधळण ही त्यांनी केली.

कुलधर्मकुळाचाराचे कार्यक्रम उरकल्यानंतर मार्तंड देव संस्थांनच्यावतीने त्यांना फुले पगडी, घोंगडी देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी देवाच्या 42 किलो वजनाच्या खंडा ( तलवारीच्या ) कसरती ही पाहिल्या. येथील समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी छगन भुजबळ यांच्यासाठी एक नवस केला होता.

CM उद्धव ठाकरे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार?

मध्यंतरीच्या काळात भुजबळांवर अनेक संकटे आली, तुरुंगात बसावे लागले. यातून सही सलामत ते सुटून बाहेर यावेत असा खंडेरायाच्या नवस समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केला होता. आज तो नवस फेडायला भुजबळ कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव येथे आल्याची चर्चा होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 20, 2020 05:03 PM IST

ताज्या बातम्या