Elec-widget

पंतप्रधान मोदींनी दिली होती सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपदाची ऑफर - पवार

पंतप्रधान मोदींनी दिली होती सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपदाची ऑफर - पवार

'राष्ट्रीय प्रश्नांवर विरोधाला विरोध करणार नाही, मात्र एकत्र येणं शक्य नाही असं मी मोदींना नम्रपणे सांगितलं.'

  • Share this:

मुंबई 02 डिसेंबर : मुंबई 02 डिसेंबर : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी स्वप्नातही घडेल असं वाटलं नव्हतं ते झालं. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आले आणि महाराष्ट्रात नवं सरकार आलं. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. हे सगळं घडविण्याचे शिल्पकार होते शरद पवार. त्यांनी गेल्या महिनाभरात घडलेल्या घटनांचा पहिल्यांदाच खुलासा केलाय. यात सगळ्यात जास्त चर्चा झाली ती शरद पवार आणि पंतप्रधान मोदींच्या भेटीची. या भेटीत नेमकं काय झालं? पंतप्रधान काय म्हणाले? हा पवारांचाच डाव होता का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर शरद पवारांनी दिलीय.

पवार म्हणाले, पंतप्रधान मोदींनी मला राष्ट्रपतीपदाची ऑफर दिली असं जे काही म्हटलं जातं ते खरं नाही. मात्र त्यांनी सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपदं देण्याची ऑफर दिली होती. मात्र भाजपसोबत जायचचं नसल्याने मी ती ऑफर नाकारली असा खुलासाही त्यांनी केला. एका मराठी वृत्त वहिनीला  दिलेल्या मुलाखतीच्या आधारे PTI ने हे वृत्त दिलाय.

नरेंद्र मोदींनीच ठेवला होता युतीचा प्रस्ताव, शरद पवारांनी केला मोठा खुलासा

शरद पवार पुढे म्हणाले, पंतप्रधानांना भेटण्याची वेळ मी आधीच मागितली होती. मात्र ते जमू शकलं नाही. शेवटी पंतप्रधान कार्यालयाने वेळ दिली. संभ्रम निर्माण व्हावा अशी पंतप्रधान कार्यालयाची इच्छा असावी. मात्र मला त्याची काळजी नव्हती. मी विदर्भातल्या दुष्काळी दौऱ्यावरून आलो होतो. मलाही त्यांना भेटायचं होतं त्यामुळे मी भेटलो.

आमच्या भेटीत शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी बोलणं झालं आणि शेवटी जाताना पंतप्रधान मोदींनीच हा विषय काढला. ते म्हणाले राज्यात तुम्ही आणि आम्ही एकत्र काम केलं तर चांगलं होईल. म्हणजे भाजप आणि राष्ट्रवादीने एकत्र यावं असं पंतप्रधानांना वाटत होतं. त्यांनीच तसा प्रस्ताव मांडल्यावर मी त्यांना स्वच्छ आणि स्पष्टपणे नाही असं सांगितलं.

Loading...

शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी अशा तयार झाल्या सोनिया, पवारांनी सांगितलं गुपित

राष्ट्रीय प्रश्नांवर विरोधाला विरोध करणार नाही, मात्र एकत्र येणं शक्य नाही असं मी मोदींना नम्रपणे सांगितलं. भाजपसोबत जाण्याला राष्ट्रवादीचं केडरही तयार नाही. आमची विचारसरणीही वेगळी आहे. त्यामुळे एकत्र येणं शक्य नाही हे मी मोदींना स्पष्टपणे सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 2, 2019 10:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...