कोरोनाच्या लढ्यात नाम फाऊंडेशनकडून 1 कोटींची मदत, सहकार्य करण्याचं नानांनी केलं आवाहन

कोरोनाच्या लढ्यात नाम फाऊंडेशनकडून 1 कोटींची मदत, सहकार्य करण्याचं नानांनी केलं आवाहन

सध्या घरातून बाहेर न पडणं हीच खरी देशसेवा असल्याचं नानांनी व्हिडीओमध्ये म्हटलं आहे

  • Share this:

मुंबई, 30 मार्च : राज्यभरात कोरोनाचा (Coronavirus) कहर वाढत आहे. कोरोनाशी (Covid - 19) लढण्यासाठी मुख्यमंत्री (CM) आणि पंतप्रधानांनी (PM) मदतीचं आवाहन केलं आहे. यात आता नाना पाटेकर (Nana Patekar) आणि मकरंद अनासपुरे (Makarand Anaspure) यांच्या नाम या फाऊंडेशनने मदतीचा हात पुढे केला आहे.

आतापर्यंत विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींपासून अगदी सर्वसामान्यांनी कोरोनाशी लढा देण्यासाठी आपल्याला जितकं शक्य आहे तितकी मदत केली आहे. हळूहळू हा मदतीचा ओघ वाढत आहे. नाना पाटेकर यांनी ट्विट करीत आपण मदत करीत असल्याचे सांगितले. अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाऊंडेशनकडून मुख्यमंत्री व पंतप्रधान  सहाय्य निधीसाठी प्रत्येक 50 लाख रुपयांची मदत करीत असल्याचे सांगितले.

काय म्हणाले नाना पाटेकर,

या क्षणाला आपण सर्वांनी जात-धर्म विसरुन सरकारला सहकार्य करण्यासाठी पुढे यायला हवं. इतक्या मोठ्या संकटाशी सरकार एकटं लढू शकत नाही. यासाठी सर्वानी एकजूट होण्याची गरज आहे. नाम फाऊंडेशनकडून मुख्यमंत्री व पंतप्रधान  सहाय्य निधीसाठी प्रत्येक 50 लाख रुपये पाठविणार आहोत. कृपया घराबाहेर पडू नका. सध्या घराबाहेर न पडण हीच मोठी देशसेवा आहे. याशिवाय कोरोनाशी लढ्यात सहकार्य म्हणून मदत कराल अशी आशा आहे.

संबंधित - अंत्यसंस्कारासाठी पोटच्या लेकराचा मृतदेह हातात घेऊन बापाची 88 किमी पायपीट

आतापर्यंत अनेक उद्योगपती, खेळाडू, अभिनेत्यांनी पंतप्रधानांना मोठी मदत केली आहे. या मदतीतून कोरोनाच्या लढ्यात वैद्यकीय यंत्रणा अधिक मजबूत करण्यास मदत होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 30, 2020 10:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading