द्राक्ष उत्पादकांच्या मदतीला धावल्या खासदार डॉ. भारती पवार, वाचवलं 8 कोटींचं नुकसान

द्राक्ष उत्पादकांच्या मदतीला धावल्या खासदार डॉ. भारती पवार, वाचवलं 8 कोटींचं नुकसान

द्राक्ष निर्यातीचा पेच सुटल्याने व्यापारी आणि शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. यामुळे सीमेवर थांबविण्यात आलेले जवळपास 100 ते 150 द्राक्षांचे कंटेनर बांगलादेशकडे रवाना झाले आहेत. काय आहे हे प्रकरण...

  • Share this:

नवी दिल्ली, 19फेब्रुवारी : राज्यातल्या द्राक्षाला जगभरातून मोठी मागणी आहे. नाशिक जिल्ह्यात निर्यातक्षम द्राक्षांचं मोठं उत्पन्न घेतलं जातं. मात्र मागील काही काळापासून बांग्लादेश आणि बांग्लादेशच्या सीमेलगत भारतीय द्राक्ष निर्यातीमध्ये काही अडचणी होत्या. बांगलादेश सीमेवरील भारतीय द्राक्ष निर्यातीला आवश्यक परवान्यांचा अडसर आता नाशिकच्या खासदार डॉ. भारती पवार यांच्या मध्यस्थीतून दूर झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचं 8 कोटी रुपयांचं नुकसान होता होता वाचलं आहे.

महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा शेतमाल निर्यात होणं अतिशय महत्त्वाचं आहे. आंतराराष्ट्रीय बाजारातून मिळणारं उत्पन्न हे अधिक असतं. निर्यातीमुळे शेतकऱ्यांना अधिकच नफा मिळून शेतकरी समृद्ध व्हायला मदत होते. पण नेमकं द्राक्ष उत्पादकांचं इथेच अडत होतं.

द्राक्ष निर्यातीचा पेच सुटल्याने व्यापारी आणि शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. यामुळे सीमेवर थांबविण्यात आलेले जवळपास 100 ते 150 द्राक्षांचे कंटेनर बांगलादेशकडे रवाना झाले आहेत. सदर प्रकरणी द्राक्ष उत्पादक शेतकरी आणि व्यापारी वर्गाने खासदार डॉ.भारती पवार यांच्याशी संपर्क साधून निर्यातीला येणाऱ्या अडचणी सांगितल्या होत्या. त्यानंतर त्यावर लगेचच तातडीने खासदार पवार यांनी अपेडा आणि केंद्रीय वाणिज्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. परवान्या संबंधित त्रुटी दूर करण्याच्या सूचना दिल्या. या सूचनांची संबंधित विभागाने तत्काळ दखल घेत निर्यातीला तातडीने परवानगी दिली. खासदार भारती पवार यांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचं सुमारे 8 कोटी रुपयांचं नुकसान होण्यापासून वाचवलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यांनी आनंद व्यक्त करून खासदार डॉ.भारती पवार यांचे आभार व्यक्त केले. खासदार डॉ.भारती पवार या शेतकऱ्यांच्या मदतीला धावून गेल्या आणि त्यांच्या होणाऱ्या संभावित नुकसानीतून मोठा दिलासा मिळवून दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 20, 2020 05:53 PM IST

ताज्या बातम्या