एका गाडीत बसू शकलो नाही मात्र एकाच स्टेशनवर आलो, उद्धव ठाकरेंचा माजी मुख्यमंत्र्यांना चिमटा

एका गाडीत बसू शकलो नाही मात्र एकाच स्टेशनवर आलो, उद्धव ठाकरेंचा माजी मुख्यमंत्र्यांना चिमटा

नागपूर शहर विकासाच्या बाबतीत इतर शहरांच्या मागे पडू देणार नाही, उद्धव ठाकरेंनी केलं नागपूरकरांना आश्वस्त

  • Share this:

नागपूर, 28 जानेवारी : आज नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्धाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. नागपूर मेट्रोच्या एक्वा लाईनवरील रिच-३ लोकमान्य नगर ते सीताबर्डी मार्गावर आजपासून मेट्रोची प्रवासी सेवा नागरिकांसाठी सुरू होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेच्या विकासाची कामं थांबणार नाहीत आणि नागपूर ही उपराजधानी मागे पडू देणार नाही, असं म्हणत जनतेला आश्वस्त केलं. एक्वा लाईनवरील मेट्रो स्टेशन आणि स्टेशनमधील अंतरानुसार महा मेट्रोने प्रवासी दर निश्चित केले आहे. लोकमान्य नगर ते सीताबर्डी दरम्यान केवळ २० रुपये प्रवासी दर निश्चित करण्यात आले. तसेच वासुदेव नगर, सुभाष नगर, इंस्टीट्युट ऑफ इंजिनिअर्स, झांशी राणी स्क्वेअर आणि सीताबर्डी या सर्व स्टेशन दरम्यान प्रवास करण्यासाठी केवळ २० रुपये प्रवाश्याना मोजावे लागणार आहे. याशिवाय रिच-१ मार्गावरील लोकमान्य नगर ते खापरी, न्यू एयरपोर्ट, साऊथ एयरपोर्ट आणि जय प्रकाश नगर व या स्टेशनवरून परत येण्यासाठी ३० रुपये दर निश्चित करण्यात आले आहे. प्रवासी दर संदर्भात माहिती सर्व स्टेशनवर देखील उपलब्ध राहणार आहे.

यावेळी उद्धव ठाकरेंनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कामाचे कौतुक केले. एका गाडीत बसू शकलो नाही मात्र एकाच स्टेशनवर आलो, असं म्हणत मुंबई, नागपूर बरोबरच राज्यातल्या इतर शहरांचांही विकास करण्याचे आश्वासन दिले. नागपूर शहर विकासाच्या बाबतीत इतर शहरांच्या मागे पडू देणार नाही. विकासाच्या कामांमध्ये खंड पडू देणार नाही. ब्रॉडगेज प्रस्तावालाही तातडीने मान्यता देऊ, असेही ते यावेळी म्हणाले.

नागपूर मेट्रोचा दुसरा टप्पा

- लोकमान्य नगर ते सीताबर्डी

- रिच-3 मार्गावर सकाळी 8 ते रात्री 8 मेट्रो सेवा

- प्रत्येक अर्ध्या तासानं मेट्रो धावणार

- अंबाझरी तलाव, गांधी सागर आणि नाग नदी या भागात असल्यानं पूर्व-पश्चिम कॉरिडोर म्हणजे एक्वा लाईन

- एक्वा लाईनवरील रिच-3 मार्ग सुरू

- शैक्षणिक संस्था, औद्योगिक क्षेत्रे, निवासी वसाहतींना फायदा

- 45 मिनिटांचा प्रवास 20 मिनिटांवर

- लोकमान्य नगर ते सीताबर्डी 20 रुपये

- वासुदेव नगर, सुभाष नगर, इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअर्स, झांशी राणी स्क्वेअर आणि सीताबर्डी - 20 रुपये

- रिच-1 मार्गावरील लोकमान्य नगर ते खापरी, न्यू एअरपोर्ट, साऊथ एअरपोर्ट आणि जयप्रकाश नगर - 30 रुपये

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 28, 2020 01:51 PM IST

ताज्या बातम्या